लेखा विभाग

NAGPURZP    23-Apr-2020
Total Views |
खाते प्रमुखाचे पदनाम मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव मनोज गोस्वामी 
विभागाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2565046
विभागाचा ईमेल [email protected]
 
प्रस्तावना :- नागरिकांची सनद याचा अर्थ कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा किंवा सेवा यांची सूची आणि सेवा सर्व सामान्य जनतेला पुरविण्यासाठी असलेली कालमर्यादा असा आहे पंचायत राज संस्थे मध्ये जिल्हा परिषद ही मुख्य व महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असून या संस्थेच्या अखत्यारीत वित्त विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागामार्फत शासनाकडून प्राप्त होणारा निधी कोषागारा मार्फत काढणे, तो जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना त्यांचे मागणीप्रमाणे वितरीत करणे. त्यांच्या जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, जिल्हा परिषदेमधून निवृत्त होणा-या कर्मचा-याना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभांचे शोधन करणे, कर्मचा-यांचे भ.नि. निधी तसेच दिनांक ३१/१०/२००५ नंतर नियुक्त कर्मचा-यांचे अंशदायी निधी इ. लेखे ठेवणे. जिल्हा परिषद, वित्त विभागातील कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता त्याच्या आस्थापानाविषयक तसेच इतर दैनदिन बाबी हाताळण्याचे काम केले जाते. वित्त विभाग व त्याच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेची रचना खालील प्रमाणे आहे. 
 • वित्त समिती 
 • मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी वर्ग १ (उपसंचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) 
 •  उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी वर्ग १ (सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ) 
 • लेखा अधिकारी – १ वर्ग-२ • लेखा अधिकारी – २ वर्ग-२ 
 •  जिल्हा व पंचायत समिती स्तरावर कार्यरत एकूण १२४ अधिकारी / कर्मचारी वर्ग-३ 
 •  कार्यविवरण 
 •  आस्थापना शाखा
 •  रोख शाखा
 • अंतर्गत लेखा परिक्षण शाखा
 • अंदाज पत्रक शाखा
 • लेखे संकलन शाखा
 • भांडार शाखा
 • निवृत्ती वेतन शाखा
 • कोषागार शाखा
 • भविष्य निर्वाह निधी शाखा
वित्त समिती
वित्त समितीमध्ये एकुण ९ सन्माननिय जिल्हा परिषद सदस्यांची निवड केली जाते. त्यामधुन एका सन्मा. सदस्याची समितीचे सभापती पदावर निवड केली जाते. मुख्य लेखा तथा वित्त्त अधिकारी या समितीचे पदसिध्द सचिव असतात. समितीमार्फत वित्त विभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते. तसेच मासीक लेख्यांला मंजुरी दिली जाते. तसेच वार्षीक लेख्यांना मंजुरी प्रदान करुन जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीस ठेवले जाते. या समितीची दर महिण्याला ( दोन सभेतील अंतर ३० दिवसापेक्षा अधिक नसावे) सभा होत असुन, वित्त विभागाचे कामकाजाचा आढावा घेतला जातो. वित्त विभागातर्फे विविध विभागामार्फत ग्रामिण विकासाच्या केंद्र शासन,राज्यशासन व जिल्हा परिषदेचा स्वनिधी मधून घेतलेल्या योजना/ विकासात्मक कामे राबविली जातात. जिल्हा परिषदेतील वित्त विभागातर्फे जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार पार पाडले जातात. वित्तीय कर्तव्ये पार पाडतांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ महाराष्ट़़ जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता १९६८, महाराष्ट़़ कोषागार नियम १९६९, महाराष्ट़़ नागरी सेवा नियम १९८१, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य् निर्वाह निधी नियम १९९८, महाराष्ट्र शासन ऊर्जा व उद्योग विभागाचे खरेदी संबंधाने शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची खरेदी नियम पुस्तिका दि.१ डिसेंबर २०१६ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश ईत्यादीचा आधार घेतला जातो. वित्त विंभागाची रचना खालील प्रमाणे आहे.
 
 परिशिष्ट-१
 
अ.क्र.

 

पदनाम

 

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

पदाची कर्तव्ये

 

१. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायात समित्या अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायात समिती लेखा संहीत, १९६८ मध्ये विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्य आदेशानुसार व कर्तव्य.
२. वित्त विभाग, जिल्हा परिषदेच सर्व विभाग आणि पंचायात समित्यांच्या लेख्यांवर नियंत्रण ठेवणे.
३. वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परीषक म्हणून काम.
४. वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूका यावर नियंत्रण ठेवणे.
५. अर्थसंकल्प : जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्त्पन्न व शासकिया विविध योजनांचे
६. आस्थापना :
६.१) लेखा संवर्गाची जिल्हा आस्थापना (बदली, पददोन्नती,जेष्ठतयाची  ही जबाबदारी राहील.)
६.२) वित्त विभागाची कार्यालीन आस्थापना(वर्ग १ ते ४).
६.३)महारष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गाच्या अधिकाऱ्यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
६.४) जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व पंचायात समित्यातील लेखा संवर्गावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
७. पंचायची राज संस्थांच्या लेख्यावरील लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप तसेच भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षिक यांच्या अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप याबाबाद समन्वय ठेवणे .
८. रु. २,००,०००/- च्या वरील देयके पारित करणे व त्याचे धनादेश अदा करणे. सर्व जिल्हा उप मुख्य लेखापरीषक अधिकारी, स्थानिक निधी लेखा महालेखापाल (लेखा व अनु ज्ञेयता ) (लेखा व परीक्षा ) महाराष्ट्र-१, मुंबई महालेखापाल (लेखा व अनु ज्ञेयता ) (लेखा व परीक्षा ) महाराष्ट्र-१, नागपूर
सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा- २ ), मंत्रालय, मुंबई
जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
९. वित्त विभागास प्राप्त होणाऱ्या सर्व नरस्त्यांचे (रु. २०००००/- च्या आतीलही) पूर्व लेख परीक्षण करणे व अभिप्राय देणे.
१०. अनुदान निर्धारण, जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनास देणे स्थिती यावर नियंत्रण.
११. मध्यवर्ती भांडार/पूर्ण नियंत्रण
१२. जिल्हा परिषदेचे खरेदी व्यवहार विहित पद्धतीने करणे
१३. आर्थिक शिस्तीचे पालन करण्यासाठी योग्य व आवश्यक नियोजन उपाय योजना व अंमलबजावणीं करणे.
१४. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायायत समित्या अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायायत समित्या लेख संहिता ,१९६८ व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे जबाबदाऱ्या स्वतः किंवा इतर अधिकाऱ्याकडून पूर्ण करून घेणे.
१५. महालेखापाल,कोषागार यांचा कार्यालयातील लेख्यांची (जमा व खर्च) ताळमेळ घालवायचा कामावर नियंत्रण ठेवणे
१६ अखर्चीत राखमांचा आढावा घेणे व शासनात वेळेत भरणा करणे.
१७. वार्षिक लेखे अंतिमीकरण करून आर्थिक स्थितीच्या अहवालासह जिल्हा परिषद सभेस सादर करणे व त्या मान्यतेनंतर शासनास सादर करणे.
१८. अंतर्गत लेख परीक्षण भांडार पडताळनी व वेतन निश्चित पथकाची कामे प्रभावित होईल या दृष्टीने संबंधित सहकारी अधिकारी / कर्मचारी यांचे कडून काम करून घेणे.
१९. वर्ग-३ वर्ग-४ कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे काम ताळमेळासह अद्ययावत राहील ह्यावर नियंत्रण ठेवणे.
२०.वर्ग-३ वर्ग-४ कर्मचारी व अंशदन निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लेख्यांचे काम ताळमेळासह अद्ययावत राहील ह्यावर नियंत्रण ठेवणे.

 
परिशिष्ट- २
 
अ.क्र.

 

पदनाम

 

उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी (जुने पदनाम वरिष्ठ लेखाधिकारी)

पदाची कर्तव्ये

 

१) आस्थापना.

१.१) वित्त विभागाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणे. ( वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रवास भत्ते व इतर वैयक्तिक प्रदाने इत्यादी )

१.२) जिल्हा परिषद वित्त विभागाचे आस्थापना विषयक प्रकरणे नस्त्या/ प्रकरणे तपासून(सर्व) अभिप्राय देणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी याना सादर करणे. (सर्व प्रकारच्या रजा, वेतनवाढ , सेवापुस्तक )

१.३) आवक जावक शाखा- विभागाची येणारे टपाल सहाय्यक लेखाधिकारी हे लेखा अधिकारी यांना सादर करतील व लेखा अधिकारी हे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे मार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करतील.

१.४) रोखशाखा- रु.२,००,०००/- च्या आतील देयके पारित करणे व त्याचे धनादेश अदा करणे. (कामांच्या व खरेदीच्या संदर्भांत रु.२,००,०००/- च्या आतील अंतिम देयके तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.)

२) निवृत्तीवेतन -निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना संबंधित प्रकरणांना मंजुरी देणे (पूर्ण अधिकारी वर्ग-३ व वर्ग -४ कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाबाबत ) व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (दि.स. पी.एस)(येन पी एस ) योजनांचे लेखे तयार करणे व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.

३) संकलन- जिल्हा परिषद लेखा विषयक सर्व जबाबदारी वार्षिक लेखा वेळेत होतील यावर नियंत्रण.

४)अर्थसंकल्प – जिल्हा परिषद स्वतःचे उत्पन्न व शासनाचे विविध योजना अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सहाय्या करणे.

५) देयक व नस्ती -पूर्व लेखा परीक्षण -सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, वित्त,बांधकाम विभाग या विभागाच्या संबंधित

 
परिशिष्ट- ३
 
अ.क्र.

 

पदनाम

 

लेखाधिकारी-१

पदाची कर्तव्ये

 

1) अर्थसंकल्प:
१.१) जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न व शासनाचा विविध योजनांचा अर्थसंकल्प तयार करून वरिष्ठांना सादर करणे.
१.२) पंचायत समितीचा अर्थसंकल्पाबाबत तपासणी व पंचायत समितीच्या उपकर अर्थसंकल्पाचे संकलन करणे व एकत्रित अर्थ संकल्प तयार करून सादर करणे.
१.३) कार्यक्रम अंदाजपत्रक (सर्व कामे)१.४) रोख अनुदान व सहाय्यक अनुदाने यांची देयके तयार करून घेऊन सादर करणे.

१.५) अर्थ संकल्पिय मंजूर तरतुदींचे पंचायत समित्यांना वाटप प्रस्तावित करणे.

१.६) केंद्रीय वित्त आयोग व महाराष्ट्र राज्य वित्त आयोग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करून सादर करणे.

१.७) अर्थसंकल्पाशी संबंधित व उपरोक्त विषयाबाबत सर्व नोंद वह्या अद्ययावत ठेवणे. नियतकालिक अहवाल सादर करणे व सर्व प्रकारचा परत व्यवहार करणे.

१.८) आहरण केलेल्या रक्कमांचा महालेखापाल कार्यालयाच्या लेख्यांशी तालमेल घालणे व तालमेलाचा अहवाल सादर करणे.

२. संकलन :-

२.१) सर्व विभागाच्या लेखाशीर्षाचे जमा व खर्चाचे लेखे ठेवणे.

२.२) पंचायत समित्यांचे लेखे स्वीकारणे, तपासणे व संकलन करणे.

२.३) मासिक खर्च विवरण पत्र तयार करून विहित दिनांकास सादर करणे.

२.४) वार्षिक लेखे तयार करणे व सादर करणे.

२.५) अर्थसंकनकल्पिय तरतुदीपेक्षा कमी अथवा अधिक झालेल्या खर्चाचे विवरणपत्र तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करणे.

२.६)अनुदान निर्धारण-मंजूर आर्थिक तरतूद खर्च प्रमाणित करून देणे.

२.७) उपयोगिता प्रमाणपत्र – मंजूर आर्थिक तरतूद व खर्च प्रमाणित करून देणे.

२.८) जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनास देणे असलेल्या रक्कमांची माहित काढून सादर करणे.

२.९) खाते प्रमुखाकडील नोंद वह्यांची पंचायत समितीच्या खर्चासह लेखाशीर्षनिहाय खर्चाचा दरमहा ताळमेळ घालणे.

२.१०) खर्चाचे मासिक/त्रैमासिक व वार्षिक विवरणपत्रे शासनाच्या संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना वेळेवर सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे.

३) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी :-

जिल्हा परिषदांच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे काम पाहणे, लेखे ठेवणे, मंजुरी व अदाइचे प्रकरणे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ह्यांना सादर करणे. ठेव संलग्न विमा योजनेचे देयके तपासणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.

४) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना-
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे लेखे ठेवणे. आहरण व वितरण केलेल्या रक्कमांचा ताळमेळ घेणे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेख्यांचे विवरणपत्र देणे.

५) देयक व नस्ती – पूर्व लेखा परीक्षण – कृषी विभाग, समाजकल्याण(अपंग कल्याणसह) महिला व बाल कल्याण विभाग(एकात्मिक बाल विकासासह) व लघु पाटबंधारे विभाग व या विभाग संबंधित नस्त्यांचे पूर्वलेखा परीक्षण करणे व अभिप्राय देऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे व रु. २,००,०००/- वरील देयके/प्रकरणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.

६) कर्जे:

व्याजी, बिनव्याजी कर्जे मंजुरीसाठी प्रकरणे सादर करणे, लेखे ठेवणे, व्याजाची गणना करणे व मसुलीवर नियंत्रण ठेवणे.

७)अग्रिमे :

मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व विभागांना दिलेल्या सर्व प्रकारच्या अग्रीमांच्या वसुलीवर नियंत्रण ठेवणे व विभागाच्या नोंदवह्यांशी ताळमेळ घेणे.

८)ठेवी :

जिल्हा निधीत जमा होणाऱ्या सर्व विभागाची ठेवींचा हिशोब ठेवणे , ठेव परतावा ठेवी व्यपगत करणे, महसूल खाती जमा रक्कमांचा परतावा, अग्रीम व त्याचे विवरण उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.

९)वित्त विभागाची रोखशाखा – वित्त विभागाची ठेवण्यात येणाऱ्या सामान्य कीर्दी –

९.१) हस्तांतरित योजना

९.२)अभिकरण योजना

९.३) जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न

९.४)ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती नीधी

९.५) घसारा नीधी

९.६)अल्पबचत प्रोत्साहनपर अनुदान

९.७)आश्र्वासित रोजगार इत्यादी रोख पुस्तके अद्यावत ठेवणे, जमा व खर्च बाजूच्या नोंदी तपासून आवश्यक त्या नोंदी साक्षांकित करणे, बँक ताळमेळ करणे,कीर्दी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे.ताळमेळात तफावत

आढळल्यास शोधून दूर करणे.

१०) लेखा आक्षेपाचे निराकरण – अर्थ विभागाची अहवाल,

महालेखापालाचे निरीक्षण अहवाल आणि आयुक्त यांचे तपासणी अहवाल यातील लेखाआक्षेपाचे संबंधित शाखेकडून अनुपालन तयार करून घेणे .

११) सोपविण्यात आलेल्या विभागाची योजना, अर्थसंकल्प व अडचणी इत्यातीबाबद समन्वयक म्हणून काम करणे

व याबाबतची माहिती उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.

१२) मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशाचे पालन करणे.

१३)सभा व बैठक उपस्थिती –

१३.१) अर्थ समितीची सर्व बैठकांना उपस्थित राहणे.

१३.२) अनुक्रमांक ५ मध्ये सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विषय समितीच्या सभेचा वृत्तांत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.

 
जिल्हा व पंचायत समिती स्तरावर कार्यरत एकूण १२४ कर्मचारी / अधिकारी वर्ग ३
जिल्हा परिषद वित्त विभागा अंतर्गत वर्ग ३ ची एकुण १२४ पदे मंजुर असुन, त्यामधे सहाय्यक लेखा अधिकारी, २६ पदे, कनिष्ट लेखा अधिकारी १९ पदे, वरीष्ठ सहाय्यक लेखा ४० पदे व कनिष्ट सहाय्यक लेखा ३९ पदे जिल्हा व पंचायत समिती स्तरावर कार्यरत आहेत. वित्त विभाग जिल्हा परिषद नागपूर मार्फत खालील कामकाज केले जाते.
१. आस्थापना शाखा – या शाखेमार्फत वित्त विभागातील राजपत्रीत अधिकारी व लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे आस्थापना विषयक कामकाज केले जाते. लेखा संवर्गातील कर्मचा-यांचे आस्थापना व इतर कामकाज (उदा. नेमणुका ,पदोन्नती, बदल्या, जेष्ठता यादया, सेवानिवृती, गोपनीय अहवाल, बिंदु नामावली तपासणी, रजा मंजुरी, न्यायालयीन व विभागीय चौकशी प्रकरणे ) लेखा संवर्गातील कर्मचा-याचे सर्व परिक्षा विषयक कामकाज सेवानिवृतीवेतन भ.नि.नि., गट विमा, अधिकारी/कर्मचारी यांचे वैदयकीय प्रतिपुर्ती प्रस्ताव तयार करुन मान्यतेसाठी सादर करणे, अतिरिक्त पदभार प्रकरणे मंजुरी, मा. आयुक्त निरीक्षण बाबतची कार्यवाही इ.बाबतचे कामकाज .
२. रोख शाखा :– या शाखेमार्फत विविध विभागाकडील शोधनार्थ मंजूर झालेल्या बांधकाम/ योजना /आस्थापना विषयक देयकांचे शोधन करण्याकरिता धनादेश तयार करणे त्याचे वितरण करणे,कोषागारातून आहारीत केलेल्या व इतरत्र प्राप्त् रक्कमांच्या नोंदी रोखवही मध्ये घेणे तसेच रोख्वही व बँक पासबुक मधील नोंदीचे ताळमेळ घेणे.
३. अंतर्गत लेखा परिक्षण शाखा :- या शाखेमार्फत जिल्हा परिषदेतील विभाग तसेच पंचायत समिती स्त्रावरील आर्थिक व्यवहाराशी संबंधीत दस्ताऐवजाची तपासणी करून आढळून आलेल्या त्रुटी, अनियमितता या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे व भविष्यात अशा बाबी घडणार नाहीत या बाबत संबंधीताना मार्गदर्शन करणे. या शिवाय स्थानिक निधी लेखा ,पंचायतीराज समिती महालेखाकार यांचे द्वारे केलेल्या लेखापरिक्षणाती आक्षेपांचे अनुपालन करण्यास मार्गदर्शन करणे. तसेच लेखा परिक्षण कालावधीत लेखापरिक्षकांना सहकार्य करणे.
४. अंदाज पत्रक शाखा :- अंदाजपत्रक ताळमेळ शाखा महाराष्ट़ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नियम १३७ व १३८ मधील तरतुदी नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वनिधीचे मुळ अदाजपत्रक ,सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात येते .सदरच्या अंदाजपत्रकाची छाननी वित्त समिती मध्ये करण्यात येते.सर्वसाधारण सभेत मा.जिल्हा परिषद सदस्यानी सुचविलेल्या दुरुस्त्या व सुचनांचा समावेश करून सुधारीत अंदाजपत्रक व मुळ अंदाजपत्रक मंजूर केले जाते.जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूरी नंतर संबंधीत विभागाकडे मंजूर निधीचे वितरण करण्यात येते.
५. लेखे संकलन शाखा :– जिल्हयातील सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील जमा खर्चाचे लेखे एकत्रीत करून जिल्हा परिषदेचा मासिक लेखा तयार केला जातो. मासिक लेखे दर महिन्याचे वित्त समितीच्या मंजूरी नंतर स्थायी समिती समोर अंतीम मान्यतेसाठी ठेवले जातात. संबंधीत विभागाकडून मासिक लेख्यांवरून जिल्हा परिषदेचे वार्षिकलेखे तयार केले जातात. सदर वार्षिक लेख्याची छाननी वित्त समितीच्या सभेमध्ये केल्यानंतर सप्टेबर पुर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण् सभेच्या मंजूरी नंतर सदरचे लेखे १५ नोव्हेंबर पुर्वी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जातात.
६. भांडार शाखा :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ मधील नियम २०२ प्रमाणे जिल्हा परिषदेचा मालसंग्रह जिल्हा परिष्द व पंचायत समितीच्या ठिकाणी ठेवता येईल. जिल्हा परिषदेकडील सर्व विभाग व पंचायत समिती यांना आवश्यक असणारे स्टेशनरी, फार्म व नोंदवहयांची खरेदी भांडार शाखेमार्फत करून वितरित केली जाते.
७. निवृत्ती वेतन शाखा :- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) १९८२ च्या नियमांचे अधिन राहून जिल्हा परिषद कर्मचा-यांचे वर्ग ३ च्या बाबतीत वयास ५८ वर्षे व वर्ग ४ च्या बाबतीत ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त् होणा-या कर्मचा-यांच्या प्रकरणाची छाननी करुन सेवानिवृती वेतन मंजूर केले जाते. सदर निवृतीवेतनधारकांना विहित मुदतीत दरमहा निवृत्तीवेतन अदा करण्याची दक्षता वित्त् विभागाकडून घेतली जाते.
८. कोषागार शाखा :– शासनाच्या विविध विकास योजना, बांधकामे, कर्मचारी वेतन ,निवृत्तीवेतन इ.संबंधाने कोषागारातून आहरित करावयाच्या रक्कमा सबंधीत विभागाकडून प्राप्त् झालेली देयके कोषागारात सादर करणे, रक्कमा आहारित करणे, तसेच विभागाचे मागणी नुसार सर्व संबधीतांना शोधन करणे.
९. भविष्य निर्वाह निधी शाखा :– जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत संगणीकृत प्रणालीचा वापर करून ठेवले जातात. भविष्य निर्वाह निधीचे परतावा/नापरतावा तसेच सेवानिवृत्त्त कर्मचा-यांचे अंतिम अदायगी कोषागारातून धनादेश प्राप्त् झाल्यानंतर केले जाते.तसेच जिल्हा परिषद सेवेत असतांना मृत्यृ झालेल्या कर्मचा-यांच्या वारसास ठेव संलग्न् योजनेचा लाभ अदा केला जातो. तसेच ०१.११.२००५ नंतर सेवेत आलेल्या जिल्हा परिषद वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांचे परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचे लेखे ठेवले जातात. Tranfer2018 Finance Dept
 
 
नागरीकांची सनद :-
 
अ.क्र. धारण केलेले पद पुरविली जाणारी सेवा पूर्तता करण्यास लागणारा कालावधी सेवा विहित कालावधीत पुरविली व गेल्यास ज्याचे कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर विभागाकडून प्राप्त नस्त्या व देयाकांना मंजुरी / शिफारस करणे सात दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर
2 उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी वर्ग -१ सेवा निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे भ.नि.निधी परतावा न परतावा देयाकांना मंजुरी देणे १ महिना १५ दिवस मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
3 लेखाधिकारी 1 वर्ग -2 स.ले.अ. कडून आलेली शिक्षण लघुसिंचन, मा.ब.क., पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी विभाग संबंधी देयके प्रकरणे सात दिवस मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
4 लेखाधिकारी 2 वर्ग -2 स.ले.अ. कडून आलेली बांधकाम पंचायत समाजकल्याण साप्रवि, भ.नि.निधी, वेतन निश्चिती इ. योजने संबंधी देयके सात दिवस मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
 
 
 
कालबध्द पदोन्नतीचा लाभ प्रदान करण्यात आलेल्या कर्मा-यांची यादी. 
 
सेवा जेष्ठता यादी २०२१ नुसार लेखा वर्गीय संवर्गातील कालबध्द पदोन्नतीचा लाभ प्रदान करण्यात आलेल्या कर्मा-यांची यादी.
 
सर्वसाधारण स्थानांतरण 2019 download करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

सहाय्य्क लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी 2021  
 
सहायक लेखाधिकारी , कनिष्ट लेखाधिकारी , वरिष्ट सहायक , कनिष्ट सहायक यांचे १. १. २१ रोजीची सेवाजेस्तता यादी