बांधकाम विभाग

NAGPURZP    23-Apr-2020
Total Views |
विभाग प्रमुखाचे नाव श्री एस. जि.गनोरकर
पदाचे नाव कार्यकारी अभियंता (बांधकाम)
विभागाचा दूरन्वनी क्रमांक 0712-2561508
विभागाचा इ-मेल [email protected]
कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा, ग्रामिण क्षेत्र

जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत बांधकाम विभाग असुन या विभागाव्दारे मुख्यत: इमारती व रस्ते बांधकाम व देखभाल दुरुस्तीची कामे त्यांचे विविध उपविभागाचे मार्फतीने कार्यान्वीत करण्यात येतात.
 
जि.प.बांधकाम विभाग नागपूर अंतर्गत एकुण 8 उपविभाग आहेत. उपविभाग व त्यांचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे :-
 
अ.क्र. उपविभाग अंतर्गत मुख्यालय कार्यरत उपअभियंता
1 जि.प.बांधकाम उपविभाग, नागपूर नागपूर ग्रामिण तालुका नागपूर श्री हेमंत आसमवार (उपविभागीय अभियंता)
2 जि.प.बांधकाम उपविभाग, हिंगणा हिंगणा, कळमेश्वर तालुका हिंगणा श्री महेंद्र उराडे 
3 जि.प.बांधकाम उपविभाग, रामटेक रामटेक तालुका रामटेक श्री अशोक मेंढे  
4 जि.प.बांधकाम उपविभाग, काटोल काटोल, नरखेड तालुका काटोल श्री प्रदीप केदार 
5 जि.प.बांधकाम उपविभाग, सावनेर सावनेर, पारशिवनी तालुका सावनेर श्री राजेश पुल्लरवार 
6 जि.प.बांधकाम उपविभाग, उमरेड उमरेड, भिवापुर तालुका उमरेड श्री संदेश गायकवाड 
7 जि.प.बांधकाम उपविभाग, कुही कुही तालुका कुही श्री खान साहेब 
8 जि.प.बांधकाम उपविभाग, मौदा मौदा, कामठी तालुका मौदा श्री प्रशांत गावंडे 

 
रस्त्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत :-
 1. पांधन रस्ते
 2. ग्रामीण मार्ग
 3. इतर जिल्हा मार्ग
 4. प्रमुख जिल्हा मार्ग
 5. प्रमुख राज्य मार्ग
 6. राष्ट्रीय महामार्ग
सन 1961 ला राज्यात प्रथम रस्ते विकास योजना मंजूर करण्यात आली. दर 20 वर्षांनी सुधारीत रस्ते विकास योजना मंजूर करण्यात येते. त्यानुसार 1961-81, 1981-2001 व 2001-2021 या प्रमाणे रस्ते विकास योजनांना मंजूरी देण्यात आलेली आहे. शासन निर्णय 24 एप्रील 2012 अन्वये 1 मे 2012 पासुन 2001-2021 या तीसरा रस्ते विकास योजनेची अंमलबजावनी करण्यात आलेली आहे.
वरील प्रमाणे रस्त्यांचे बांधकाम करतांना शासन मानकानुसार प्रथमत: सरकारी पांधनीचा उपयोग केला जातो. परंतु रस्ता बांधकामासाठी ज्या ठिकाणी शासकीय पांधन उपलब्ध न झाल्यास खाजगी जमीनीची भुसंपादन करून रस्त्याचे बांधकाम केल्या जाते. रस्त्याचा प्रकार व दर्जा ठरवितांना खालील प्रमाणे निकष मुख्यत: निर्धारित करण्यात येते.
 1. पांधन रस्ता :- पांधन रस्त्यांचा उपयोग मुख्यत: शेतात जाणे-येणे साठी केल्या जातो.
 2. ग्रामीण मार्ग :- 2 गांवांना जोडणारा रस्ता तसेच मुख्य मार्गापासुन गावांना जोडणारा रस्ता म्हणजे ग्रामीण मार्ग होय. महसुल खात्याअंतर्गत अस्तीत्वातील शासकीय पांधन रस्त्याला रस्ते विकास आराखडयामध्ये समाविष्ट केल्यावर पांधन रस्त्याचे रूपांतर ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यात होते. ग्रामीण मार्गाच्या रस्त्याचा डांबरीपृष्ठभाग हा 3.00 मीटर रूंदीचा असतो. या रस्त्याची भार वहन क्षमता कमी असते.
 3. इतर जिल्हा मार्ग :- 2 पेक्षा जास्त गावांना जोडणारा तालुका अंतर्गतचा रस्ता म्हणजे इतर जिल्हा मार्ग होय. ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त गावांना जोडणारा ग्रामीण मार्ग दर्जाचा रस्ता इतर जिल्हा मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येतो. इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग हा 3.75 मीटर रूंदिचा असतो.
 4. प्रमुख जिल्हा मार्ग :- 2 पेक्षा जास्त तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग होय. इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त तालुक्यातील व मोठया लोकसंख्येच्या गांवांना जोडणारे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येतात. या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग 3.75 मी. रूंदीचा असतो. सदर प्रकारच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतात.
 5. राज्य मार्ग :- 2 पेक्षा जास्त जिल्हयांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे राज्य मार्ग होय. प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त जिल्हयातील व मोठया लोकसंख्येच्या गांवांना जोडणारे रस्ते राज्य मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येते. या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग 5.50 मी. रूंदीचा असतो.
 6. प्रमुख राज्य मार्ग :- राज्यातील प्रमुख जिल्हयांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे प्रमुख राज्य मार्ग होय.
 7. राष्ट्रीय महामार्ग :- 2 पेक्षा जास्त राज्यांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय.
नागपूर जिल्हयातील रस्ते लांबी (कि.मी.मध्ये) :-
 
अ.क्र.
रस्त्याचा प्रकार रस्ते विकास आराखडा 2001-21 प्रमाणे लांबी डांबरी पृष्ठभाग खडीचा पृष्ठभाग मुरुम पृष्ठभाग मातीचा रस्ता
1 ग्रामिण मार्ग 8091.42 2253.75 1341.47 274.50 4221.70
2 इतर जिल्हा मार्ग 2859.06 1383.95 283.12 56.40 1135.59
3 प्रमुख जिल्हा मार्ग 1486.85 1486.85
4 राज्य मार्ग 1107.54 1107.54
5 प्रमुख राज्य मार्ग 176.34 176.34
6 राष्ट्रीय महामार्ग 342.41 342.41
  एकुण 14063.62 6750.84 1624.59 330.90 5357.29

अ. क्र. लोकसंख्येप्रमाणे गावांची संख्या डांबरी पृष्ठभागाने जोडलेली गांवे खडीच्या रस्त्यांनी जोडलेली गांवे
1 1500 पेक्षा जास्त 229 229
2 1000 ते 1499 181 181
3 500 ते 999 512 499 13
4 500 पेक्षा कमी 695 590 105
  एकुण 1617 1499 118
 
बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना :-
1) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत परिवहन शीर्षकाखाली कामे.
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण
2) क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कामे
3) क वर्ग पर्यटन विकास कामे
4) आदिवासी उपयोजना अंतर्गत जिल्हा रस्ते जनजाती क्षेत्र उपयोजनांची कामे
5) स्थानिक विकास कार्यक्रम
अ) खासदार निधी
ब) आमदार निधी
6) आंगणवाडी इमारत बांधकामे
7) प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे
8) ऍ़लोपॅथिक दवाखाने बांधकामे/दुरुस्ती
9) आयुर्वेदिक दवाखाने बांधकामे/दुरुस्ती
10) पशुसंवर्धन दवाखाने बांधकामे / दुरुस्ती
11) 2515 ग्रामिण विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशासकिय इमारती बांधकामे
12) ब वर्ग तिर्थक्षेत्र विकास कामे
13) प्रादेशिक पर्यटन विकास कामे
14) 2515 अंतर्गत मा.लोकप्रतिनिधिंनी सुचविलेली कामे.
15) ठक्कर बाप्पा आदिवासी विकास कार्यक्रम.
16) 13 वा वित्त आयोग (राज्य स्तर) अंतर्गत रस्ते दुरुस्ती
17) 13 वा वित्त आयोग(जिल्हा परिषद स्तर)अंतर्गत दहनभुमी/दफनभुमी देखभाल दुरुस्तीची कामे.
18) 2059-अंतर्गत इमारत दुरुस्ती कार्यक्रम
19) रस्ते देखभाल दुरूस्ती कार्यक्रम (अ-गट,ब-गट,क-गट,ड-गट,ई-गट)
20) जि.प.सेस फंड अंतर्गत कामे
 
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत परिवहन शिर्षकाखाली कामे :-
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण
आर्थिक वर्षातील मंजुर नियतव्ययानुसार लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रतिनिधींनी सुचविलेली ग्रामिण भागातील जिल्हा रस्ते आराखडयामध्ये समाविष्ट असलेल्या रस्त्याची कामे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे शिफारसी नुसार जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येतात. सदर कामांना मा.पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडुन मंजुरी प्राप्त होते. मंजुरी प्राप्त कामांना जिल्हा नियोजन समितीकडुन निधी उपलब्ध होतो. या मंजुर कामांना प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा विषयक प्रक्रिया पुर्ण करुन जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत कार्यान्वीत करण्यात येतात.
 
क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कामे

क वर्ग पर्यटन विकास कामे
आर्थिक वर्षातील मंजुर नियतव्ययानुसार लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींंनी सुचविलेली कामे, शासनाने घोषित केलेल्या तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राचे ठिकाणी विकास कामे करण्याकरीताचे प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम समितीचे शिफारसी नुसार जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येतात. सदर कामांना मा.पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील समितीकडुन मंजुरी प्राप्त होते.मंजुरी प्राप्त कामांना जिल्हा नियोजन समितीकडुन निधी उपलब्ध होतो. या मंजुर कामांना प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा विषयक प्रक्रिया पुर्ण करुन जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत कार्यान्वीत करण्यात येतात. विकास कामामध्ये खालील कामांचा समावेश अंतर्भुत आहे.
1) तिर्थस्थळे/यात्रास्थळे जोडण्यासाठी मुख्य रस्त्यापासुन 1 कि.मी.पेक्षा कमी अंतराचा पोच मार्गाचे बांधकाम/मजबुतीकरण करणे.
2) पोच रस्त्यावर पथदिवे उभारणे.
3) पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधणे व परिसरात पाणि पुरवठा करणे.
4) तिर्थक्षेत्र नदी किंवा ओढा जवळ असल्यास संरक्षण भिंत बांधकाम करणे.
5) स्त्री/पुरुष शौचालय व स्नानगृह बांधकाम करणे.
6) स्त्री/पुरुष भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास बांधकाम करणे.
7) तिर्थक्षेत्राचे परिसरामध्ये झाडे लावणे,वाहनतळ बांधकाम करणे.
 
आदिवासी उपयोजना अंतर्गत जिल्हा रस्ते जनजाती क्षेत्र उपयोजनांची कामे :-
आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी क्षेत्रामध्ये विकास कामे प्रस्तावित करावयाची असुन या कामाचे प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या शिफारसीने आदिवासी विभागाकडे सादर करण्यात येतात.आदिवासी विभागाकरीता उपलब्ध असलेल्या नियतव्ययानुसार सदर कामांना प्रशासकिय मंजुरी व मंजुर कामाकरीता आदीवासी विभागातर्फे जिल्हा नियोजन समितीकडुन मंजुर तरतुदीमधुन निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.
 
स्थानिक विकास कार्यक्रम
अ) खासदार निधी
ब) आमदार निधी
आर्थिक वर्षात मा.खासदार/आमदार महोदयांकडुन स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणा-या निधीमधुन मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडे कामे व कार्यान्वयीन यंत्रणांची शिफारस केली जाते. त्याअनुषंगाने नियोजन विभागाकडून जिल्हा परिषद कार्यान्वयीन यंत्रणा असल्यास प्राकलने मागविण्यात येतात. प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध झाल्यानंतर कामे कार्यान्वीत करण्यात येतात.
 
आरोग्य विभाग
अ) आदिवासी क्षेत्र
1) प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे
ब) बिगर आदिवासी क्षेत्र
1) प्राथमिक आरोग्य केंद्र /उपकेंद्र बांधकामे व दुरुस्ती.
2) ऍ़लोपॅथिक दवाखाने बांधकामे/दुरुस्ती
3) आयुर्वेदिक दवाखाने बांधकामे/दुरुस्ती
आरोग्य विभागाकडुन नमुद शिर्षकांतर्गत प्रशासकिय मान्यता प्राप्त कामाकरीता उपलब्ध होणा-या तरतुदीमधुन सदर कामे कार्यान्वीत करण्यात येतात. सदर कामाकरीता जिल्हा नियोजन समितीकडुन आरोग्य विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येतो
 
पशुसंवर्धन
अ) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पशुवैद्यकिय दवाखाना बांधकामे
ब) पशु रुग्णालय व दवाखाने (परिरक्षण) योजनेअंतर्गत बांधकामे.
पशुसंंवर्धन विभागाकडुन नमुद शिर्षाअंतर्गत प्रशासकिय मान्यता प्राप्त कामाकरीता उपलब्ध होणा-या तरतुदीमधुन सदर कामे कार्यान्वीत करण्यात येतात.सदर कामाकरीता जिल्हा नियोजन समितीकडुन निधी उपलब्ध करुन देण्यात येतो
2515 ग्रामिण विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशासकिय इमारती
जिल्हा परिषद प्रशासनाकडुन प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रशासकिय इमारतीचे बांधकामाकरीता सदर शिर्षाअंंतर्गत प्रशासकिय मान्यता प्राप्त कामे कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत.सदर कामाकरीता ग्राम विकास विभागाकडुन निधी उपलब्ध होतो.
ब वर्ग तिर्थक्षेत्र विकास कामे
राज्य शासनाकडुन ब वर्ग तिर्थक्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या तिर्थक्षेत्रामध्ये मंजुर आराखडयानुसार प्रस्तावित केलेल्या कामांना ग्राम विकास विभागाकडुन ब वर्ग तिर्थक्षेत्रातील कामांना मंजुरी व निधी प्राप्त होतो.
नागपूर जिल्हयातील खालील तिर्थक्षेत्रांना शासनाकडुन ब श्रेणी तिर्थक्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे.
1) परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत पावडवना ता.मौदा.
2) श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी.
 
प्रादेशिक पर्यटन विकास कामे
राज्य शासनाकडुन प्रादेशिक पर्यटन म्हणुन घोषित झालेल्या क्षेत्रामध्ये मंजुर आराखडयानुसार प्रस्तावित केलेल्या कामांना ग्राम विकास विभागाकडुन पर्यटन क्षेत्रातील कामांना मंजुरी व निधी प्राप्त होतो.
 
2515 अंतर्गत मा.लोकप्रतिनिधिंनी सुचविलेली कामे
 
ग्रामिण भागातील जनतेकरीता अतिआवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या कामांना राज्य शासनाकडुन मंजुरी व निधी प्राप्त होतो.निधीच्या उपलब्धतेनुसार कामे कार्यान्वीत करण्यात येतात.
 
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम.
ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेअंतर्गत शासनाने घोषित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र,अतिरीक्त उपयोजना क्षेत्र,माडा-मिनिमाडा,प्रस्तावित,माडा-मिनिमाडा क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील 50 टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या वस्त्या,गावामध्ये विकास कामाकरीता प्रस्तावित कामांना सदर योजनेमधुून आदीवासी विभागाकडुन मंजुरी व निधी प्राप्त होतो.
अ) 1000 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या गांवांना रु.20.00 लक्ष एका कामासाठी
ब) 500 ते 999 आदिवासी लोकसंख्या असलेल्या गांवांना रु.12.50 लक्ष एका कामासाठी
क) 499 पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या गांवांना रु.7.50 लक्ष एका कामासाठी
वरीलप्रमाणे या योजनेअंतर्गत एका वर्षात एका गावात जास्तीत जास्त 2 कामे घेता येतात व दोन्ही कामासाठी मर्यादा रु.31.25 लक्ष एवढी आहे.
यामध्ये मुख्य वस्तीपर्यंंत जोड रस्ते,गावाअंतर्गत काँक्रीट रस्ते बांधकामे,शाळेचे कंपाऊंड,पाणि पुरवठा योजना,सार्वजनीक हौद बांधकामे,नाली बांधकामे,आदीवासी वस्तीत विद्युतीकरण,मार्ग दिप बसविणे,समाज मंदिर,मंगल कार्यालये,वाचनालये,व्यायाम शाळा बांधकाम करणे,सार्वजनिक शौचकुप व मुता-यांचे बांधकामे,स्मशानभुमी बांधकामे,नदिकाठी संरक्षण भिंत,घाट बांधकामे,तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कामे,ग्रांमपंचायत कार्यालय/ग्राम सचिवालय बांधकामे प्रस्तावित करण्यात येतात.
 
13 वा वित्त आयोग (राज्य स्तर) अंतर्गत रस्ते दुरुस्ती
13 वा वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य स्तरावरुन मंजुर झालेल्या ग्रामिण भागातील रस्ते विकासाकरीता उपलब्ध होणा-या निधीमधुन सदर कामे कार्यान्वीत करण्यात येतात. यामध्ये प्रस्तावित रस्ते जिल्हा रस्ते आराखडयात समाविष्ठ असलेल्या रस्त्यांचे काम कार्यान्वीत करण्यात येतात.
13 वा वित्त आयोग(जिल्हा परिषद स्तर)अंतर्गत कामे
13 वा वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार लोकसंखेच्या अनुपातात उपलब्ध होणा-या तरतुदीमधुन 70 टक्के ग्राम पंचायत स्तर व 20 टक्के पंचायत समिती स्तर व 10 टक्के जिल्हा परिषद स्तर या नुसार शासनाकडुन उपलब्ध होणा-या निधीमधुन तरतुदीचे 10 टक्के निधीचे समप्रमाणात जिल्हा परिषद प्रभाग निहाय कामांची निवड करुन कामांना मंजुरी प्रदान करुन सदर कामे कार्यान्वीत करण्यात येतात.
 
2059-अंतर्गत इमारत दुरुस्ती कार्यक्रम
मा. अधिक्षक अभियंता,सा.बा.मंडळ,नागपूर यांचे कडुन जिल्हा परिषद क्षेत्रातिल जुन्या जनपदकालीन प्रशासकिय इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकरीता उपलब्ध होणा-या निधीमधुून सदर कामे कार्यान्वीत करण्यात येतात
 
रस्ते देखभाल दुरूस्ती कार्यक्रम (अ-गट,ब-गट,क-गट,ड-गट,ई-गट)
सन 2011-12 पर्यंत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामिण रस्ते व इतर जिल्हा रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीकरीता अधिक्षक अभियंंता, सा.बा.मंडळ.नागपूर यांचे मंजुरीने कामे कार्यान्वीत करण्यात येत होती.सध्यास्थितीत ग्रामिण रस्त्याचे विकासाकरीता राज्य शासनाचे मंंजुूरीने कामे कार्यान्वीत करण्यात येतात.निकष खालील प्रमाणे
अ-गट:- खड्डे दुरुस्तीचे काम (आर्थिक वर्षातील मंजुर तरतुदीच्या 15 टक्के निधीमधुन)
ब-गट:- सर्वसाधारण दुरुस्तीचे काम (आर्थिक वर्षातील मंजुर तरतुदीच्या 70 टक्के निधीमधुन)
डांबरी /खडी नुतनीकरणाची कामे. व विशेष दुरुस्ती कामे.
क-गट:- लहान मो-यांची दुरुस्तीचे काम (आर्थिक वर्षातील मंजुर तरतुदीच्या 10 टक्के निधीमधुन)
ड-गट:- पुरहानी अंतर्गत कामे (आर्थिक वर्षातील मंजुर तरतुदीच्या 5 टक्के निधीमधुन)
सदर कामांचे प्रकारापैकी अ-गट व ड-गट ची कामे अतिरीक्त मुख्य कार्यकारीत अधिकारी यांचे पुर्व मंजुरीनी कार्यकारी अभियंता बांधकाम यांचे स्तरावर मंजुर करण्यात येतात.
सदर कामांचे प्रकारापैकी ब-गट व क-गट तिल कामांना शासन स्तरावरुन मंजुरी प्राप्त होते. सदर योजनेकरीता ग्राम विकास विभागाकडुन तरतुद उपलब्ध होते.
 
जि.प.सेस फंड अंतर्गत कामे
1) आरोग्य विभागानी प्रस्तावित केलेली कामे
2) समाजकल्याण अंतर्गत मागास वर्गीय मुलांचे /मुलींचे वसतीगृह दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत मंजुर कामे
3) बांधकाम विभागाअंतर्गत कामे
4) 17 सामुहिक विकास कार्यक्रम (जिल्हा परिषद सदस्य निधी)
जिल्हा परिषदेला शासनाकडुन उपलब्ध होणारे मुद्रांक शुल्क,उपकर,तसेच जिल्हापरिषद मालकिच्या स्त्रोतातुन उपलब्ध होणारा निधीमधुन 20 टक्के समाज कल्याण, 20 टक्के ग्रामिण पाणि पुरवठा, 10 टक्के महिला बाल कल्याण तसेच 3 टक्के अपंग विकासाकरीता निधी राखीव ठेऊन उर्वरीत 50 टक्के मधुन इतर विभागाच्या योजनांनवर निधीचे नियोजन करण्यात येते.या शिर्षामधुन 17 सामुहिक विकास कार्यक्रमाकरीता जिल्हा परिषद प्रभाग निहाय निधीचे नियोजन करुन जिल्हा परिषद प्रतिनिधींनी प्रस्तावित केलेली ग्रामिण विकासाची कामे कार्यान्वीत करण्यात येतात
 
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नागपूर
1) बांधकाम विभाग हा जिल्हा परिषद नागपुर अंतर्गत विभागीय कार्यालय अंतभुत असुन त्यात 8 उपविभाग आहेत. शासकिय कर्मचा-यांचा बदल्यांचे विनिमयन आणि शासकिय कर्तव्य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबध अधिनियम, 2005 मधील कलम -8 मधील तरतुदीनुसार बांधकाम विभाग नागरीकांची सनद प्रसिध्द करीत आहेत या खात्याशी संबधित असणा-या सेवा तत्परतेने , सौजन्यपुर्वक नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.
2) विभागाची रचना :- कार्यकारी अभियंता जि.प. नागपुर हे बांधकाम विभागाचे प्रमुख असुन यांचे अधिपत्याखाली उप कार्यकारी अभियंता, जि. प. बांधकाम उपविभाग – नागपुर (बांध) ह्या अधिनस्त असलेले उपकार्यकारी अभियंता हे 33 अधिक्षक हे प्रशासकिय अधिकारी आहे. या प्रशासकिय अधिका-याकडे एकुण 33 कार्यासनामध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे.
3) वेळापत्रक :- बांधकाम विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवाच्या कार्यपुर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट 2 येथे सादर करण्यात आले आहे.
4) या विभागाशी सबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध आहेत. या विभागाकडुन वेळोवेळी निर्गमीत होणा-या नियम तथा शासन निर्णयाची माहिती www.maharashtra.gov.in या सकेंत स्थळावर अदयावत करण्यात येते.
5) (अ).गा–हाणी/तक्रारी यांचे निराकरण :- कार्यपुतीस होणारा विलंब वा अन्य काही गा-हानी असल्यास त्यासंबधी परिच्छेद-3 मध्ये नमुद केलेल्या अधिका-याकडे तक्रार नोंदविता येईल. व तक्रार प्राप्त झाल्यापासुन 7 दिवसात त्याची पुर्तता करण्याची जबाबदारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर यांचे कडे नोदविता येईल.
(ब) नागरीकांचा सनदेचा आढावा/सिंहावलोकन :- या नागरिकाच्या सनदेच्या उपयुक्तते बाबत तथा परिणाम कारकतेचा आढावा बांधकाम विभागाकडुन दरमहा घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.)
(क)जनसामान्याकडुन सुचना :-ही नागरीकाची सनद सर्वसामान्य नागरिकांचा छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरीकांचा बहुमुल्य सुचनाचा गांभिर्यपुर्वक विचार करून त्यात वेळोवेळी सुधारणा घडवुन आणता येतील. बांधकाम विभागाच्या अधिनिस्त येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क माडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.
6) नागरीकांचा सनदेची अंमलबजावणी :- बांधकाम विभाग, नागरिकांचा या सनदेची अमलबंजावणी करण्यास कटिबध्द आहे. बांधकाम विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करून देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरवितांना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी/कर्मचा-यांची राहील.
 
कार्यकारी अभियंता (बांध.)
जिल्हा परिषद, नागपूर.
आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या कामांच्या व विकास कामांच्याबाबतीत तांत्रिक मंजूरी देतील
प्रत्येक वर्षी, आपल्या विभागात काम करणा-या वर्ग दोनच्या सेवेतील अधिका-यांच्या कामांचे मूल्यमापन करील आणि त्याबाबतचे आपले मत गोपनियरित्या अति. मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठविल.
वर्ग 2,3 व वर्ग 4 चे कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.
 
कर्मचारी यांचे कर्तव्य
कार्यसुचीनुसार दिलेली कामे वेळीच पार पाडणे.
अधिका-यांनी सोपविलेली कामे जबाबदारीने व नियमानुसार पार पाडणे.
 

अ.क्र. पदनाम सेवेचा तपशिल
1 उप . कार्यकारी अभियंता 1.जन माहिती अधिकारी 2.विभागातील विविध योजनेअंतर्गत तयार अंदाजपत्रकाची तांत्रिक तपासणी करणे 3.तांत्रिक शाखा वरील तांत्रिक बाबी करीता पर्यवेक्षण करणे. 4.लेखा विषयक विविध प्रकरणी अभिप्राय देणे. 5.लेखा विषयक प्रकरणे, उदा. वेतन देयके, कंत्रटदाराचे देयके, व इतर लेखा बाबी निकालात काढणे. 6.वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे
2 अधिक्षक 1.सहा. माहिती अधिकारी म्हणून कार्य करणे. 2.गोपनिय अहवाल व त्याबाबतचा पत्रव्यवहार. 3.कार्यालयीन कामकाजावर सनियंत्रण ठेवणे. 4.आस्थापना विषयक नस्ती तपासून अभिप्राय देणे. 5.हजेरी पटावर सनियंत्रण ठेवणे. 6.कंत्राटदार नोंदणी प्रकरणे निकालात काढणे. 7.वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे.
3 सहा. लेखा अधिकारी 1.लेखा विषयक बाबी तपासून सादर करणे. 2.योजनाविषयक कामांचे अर्थसंकल्प तयार करणे. 3.वेतन व इतर देयके तपासून सादर करणे. 4.उपविभाग निहाय अंकेखणाचे कामावर नियंत्रण 5.विविध योजनांच्या खर्चाची माहिती देणे. 6.निवीदा विषयक प्रक्रीया कार्यान्वीत करणे
4 शाखा अभियंता 1.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किमान गरजा कार्यक्रम तयार करणे. 2.13 वा वित्त आयोग जि.प. स्तर नियोजन करणे. 3.अंदाजपत्रकाची तांत्रिक तपासणी करणे. 4.कंत्राटदारांचे देयकांची तांत्रिक तपासणी करणे. 5.आमदार/खासदार निधी अंतर्गत कामाचे प्राकलने मागवुन तांत्रिक तपासणी करून मा. जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरीस पाठवणे.
5 शाखा अभियंत 1.रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अ,ब,क,ई योजनेअंतर्गत नियोजन तयार करणे. 2.13 वा वित्त आयोग रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाचे नियोजन करणे. 3.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत क तिर्थक्षेत्र, क पर्यटन क्षेत्र विकास, ब तिर्थक्षेत्र प्रादेशिक पर्यटनाचे नियोजन करणे. 4.ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रमाचे नियोजन. 5.उपरोक्त योजनेतील प्राकलने तांत्रिक मंजूरी कामाचे देयके तपासणे.
6 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 1.विभागांतर्गत उपविभागातील वाहनांची देखरेख दुरुस्ती कार्यक्रम.
2.वाहनांची निर्लेखन प्रस्ताव तयार करणे.
3.निरुपयोगी यंत्र सामुग्रीचे लिलाव करणे.
7 प्रमुख आरेखक 1.विधानसभा तारांकित/अतारांकित प्रश्न/ कपात सुचना
2.रस्ते सांख्यिकी
3.जि.प. अंतर्गतचे स्तरावर पाईप लाईन / केबल लाईन टाकण्याची परवाणगी देणे.
4.जि.प. रस्त्याचे संबंधाने कृषक जमिन अ-कृषक करण्याचे प्रस्ताव.
5.भुसंपादन प्रकरणे व सायकल स्टॅन्ड
6.रस्ते हस्तांतरण
7.वाहन गणती
8.विभागप्रमुखाने सांगितलेली कामे
8 शाखा अभियंता (विद्युत) 1.विद्युत बाबत अंदाजपत्रक मंजूर करणे.
2.प्रशासकीय मंजुरी घेणे.
9 आरेखक 1.बांधकामावर केलेल्या निरीक्षण टिपणीनुसार निर्गमीत झालेले अवलोकन ज्ञापने. 2.जि.प. मालकीची इमारत पाडणे बाबत ना हरकत प्रमाणपत्रास मंजूरीस सादर करणे. 3.नविन इमारतीची झालेल्या मुल्याकनाच्या आधारे भाउे प्रमाणपत्र निर्गमीत करणे. 4.मा. अधिक्षक अभियंता यांचे निरीक्षण टिपणी. 5.मा.अति मुका.अ. यांचे निरीक्षण टिपणी अनुपालन सादर करणे 6.विभागा प्रमुखाने सागितलेली कामे.
10 स्थापत्य अभि. सहाय्यक 1.शाखा अभियंता यांना सहाय्यक व जि.प. सेस फंड अंतर्गत 17 वा.वि.यो. प्रशासकीय मान्यता प्रदान करणे व अंकेक्षण करणे. 2.रो.ह.यो. अंतर्गत व म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत पत्रव्यवहार व माहिती ठेवणे. 3.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे.
11 वरिष्ठ सहाय्यक 1.आमदार/खासदार निधी वितरीत करणे. 2.तिर्थक्षेत्र क व ब वर्ग/ पर्यटन विकास निधी वितरीत करणे व अंकेक्षण करणे. 3.पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामे.
12 वरिष्ठ सहाय्यक 1.ई-निवीदा प्रसिध्द करणे. 2.ई- निवीदा पध्दतीने सु.बे.अमजूर सह.संस्था यांना काम वाटप करून करारनामे करणे 3.वित्त विभागाकउून प्राप्त मंजूर नस्तीचे कार्यारंभ आदेश तयार करणे.
13 कनिष्ठ सहाय्यक विभागातील बजट विषयक कामे.
14 कनिष्ठ सहाय्यक 1.रोखपाल/भांडारपाल 2.मासिक वेतन वितरीत करणे विभागासंबंधिची जमा रक्कम घेणे व त्यांचा भरणा करणे. 3.टीडीएस सर्टीफीकेट देणे. 4.संगणक/प्रीटर्स/झेरॉक्स मशीन देखभाल दुरुस्ती करणे. 5.टेडन फार्मची वाटप करणे
15 अनुरेखक 1.विभागीय/जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणे निकाली काढणे. 2.स्थावर मालमत्ता नोंदवही 3.जमीनी बाबत पत्रव्यवहार नस्ती. 4.अतिक्रमणाबाबत पत्र व्यवहार नस्ती. 5.मार्च अखेरचे तालुका नकाशे/बार चार्ट संकलित करणे. 6.श्री. हलगुले, शाखा अभियंता यांचे सहाय्यक.
16 वरिष्ठ सहाय्यक 1.विभागातील कर्मचारी यांचे मासिक वेतन देयके तयार करणे/ आस्थापना. 2.वैद्यकीय देयके/प्रवास भत्ता देयके व इतर देयके तयार करणे. 3.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे.
17 वरिष्ठ सहाय्यक 1.अंतर्गत अ,ब,क,ड व ई / 13 वा वितत आयोग (राज्यस्तर) 2.12 वा वित्त आयोग (राज्यस्तर) 3.अंकेक्षण करणे, रस्ते.
18 कनिष्ठ सहाय्यक 1.राज्य मार्ग निधी, किमान गरजा कार्यक्रम धरून व सोडुन, पुनर्वसन 2.अंकेक्षण – राज्य व पुल डांबरीकरण.
19 कनिष्ठ सहाय्यक 1.शुसंवर्धन/ 13 वा वित्त आयोग (जि.प.स्तर) 2.ग्राम पंचायत भवन (जि.प. स्तर) 3.खनिजकर्म विकास योजना अंकेक्षण
20 वरिष्ठ सहाय्यक 1.आरोग्य बांधकाम अंकेक्षण 2.जिल्हा प्रशासकीय इमारत
21 विस्तार अधिकारी (साख्यिकी) 1.गुणानुक्रम माहिती तयार करून दरमाह सादर करणे. 2.पंचायत राज समितीचे मुद्ये (प्रश्नावली) व अनुपालन करणे 3.वार्षीक प्रशासन अहवालाची सुधारीत प्रश्नावली तयार करणे. 4.मुख्य अभियंता यांचे निरीखण बाबत अनुपालन 6.मा. आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचे निरीक्षण तपासणी. 7.स्थानिक लेखा परिक्षण लेखा आक्षेप 8.पंचायत राज समितीचे लेखा आक्षेप. 9.महालेखाकार यांचेकडील लेखा परिक्षण. 10.बांधकाम समिती सभा बाबत संपूर्ण कार्यवाही.(कार्यवृत्त वगळून) 12.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे करणे.
22 स्था.अभियांत्रिकी सहाय्यक तांत्रिक विभागातील शाखा अभियंता यांना मदत करणे.
23 वरिष्ठ सहाय्यक 1.ठक्करबाप्पा/2515 मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे. 2.विदर्भ वैधानिक विकास योजना. 3.अंकेक्षण.
24 वरिष्ठ सहाय्यक 1.विभागातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. 2.ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झालेल्या कामांचे करारनामे प्रक्रीया करणे
25 वरिष्ठ सहाय्यक 1.अभिलेखागाराचे नियंत्रण म्हणून काम सांभाळणे. 2.तक्रारी विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे
26 वरिष्ठ सहाय्यक 1.वर्ग 1 तांत्रिक अधिकारी व शाखा अभियंता यांची आस्थापना विषयक कामे. 2.विभागातील अधिकारी यांचे मासिक वेतन देयके तयार करणे
27 वरिष्ठ सहाय्यक निवीदा विषयक सहाय्यक.
28 वरिष्ठ सहाय्यक सी आर .टी . मजूर आस्थापना विषयक कामे
29 कनिष्ठ सहाय्यक आवक शाखा
30 कनिष्ठ सहाय्यक दुय्यम अभियांत्रिक आस्थापना विषयक कामे
31 जोडारी जावक विभाग·

कार्यालय :- बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नागपूर
विषय :- नागरिकांची सनद
परिशिष्ट 1
 
 


अ.क्र. विभागाचे नांव योजनेचे नांव योजना राबविण्याचा कालावधी योजनेचा लाभ घेण्यास पात्र लाभार्थी/ यांजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी पात्रता अर्जासोबत सादर करावयाचे दस्ताऐवज
1 बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नागपूर. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी प्राप्त कामे
. बांधकाम विभागांतर्गत कामे
1 ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण
2 तिर्थक्षेत्र विकास
3 पर्यटन विकास कार्यक्रम
. आरोग्य विभागांतर्गत कामे
1 प्रा. आरोग्य केंन्द्र / उपकेंन्द्र बांधकामे व दुरुस्ती
. एकात्मिक बाल विकास प्रकल्प
1 अंगणवाडी बांधकामे
. आदिवासी विकास प्रकल्प
1 ओटिएसपी/ माडा रस्ते
. जि.. सेसे फंड
एक आर्थिक वर्ष, प्रशासकीय मान्यतेनुसार, मंजूर निधी नुसार व कामाचे स्वरूपानुसार कामाचा कालावधी 3 महिने ते 12 महिने पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये नोंदनिकृत कंत्राटदारांना नोंदणी प्रक्रीयेमधून वाटप झालेल्या कामाचा करारनामा करण्याकरीता कॉन्ट्राक्टच्या किंमतीच्या 1 टक्का अनामत रक्कम स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेवून कार्यारंभ आदेश देऊन नमुद कालावधीत कामे पुर्ण करुन घेण्यात येतात. केत्रटदारांचे नोंदणीपत्र / आयकर/ विक्रीकर प्रमाणपत्र अनामत रक्कम असतात.

अ.क्र. सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नांव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-यांचे नांव व हुद्दा
1 नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागात बांधकाम विषयक विविध विकास कामे करण कार्यकारी अभियंता (बांध.), जि.प. नागपूर
उप कार्यकारी अभियंता (बांध.), जि.प. नागपूर
यांजनानिहाय मुदत निश्चित करण्यात येते. 1.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर
2. मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर

 
 
 
सर्वसाधारण स्थानांतरण 2019 download करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
 
 
Transfer Final List Of J.E. & C.E.A. Works Dept.