विभाग प्रमुखाचे नाव |
श्री किशोर भोयर |
विभाग प्रमुखाचे पदनाम |
जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
विभागाचा दूरन्वनी क्रमांक |
0712-2564324 |
विभागाचा इ-मेल |
[email protected] |
रचना :-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
भारतीय राज्य घटनेतील कलम 46 मधिल तरतुदीनुसार घटकराज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून यांचे संरक्षण करील या संविधानात्मक बांधिलकीमुळे महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली येणा-या समाज कल्याण संचालनालय, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग कल्याण संचालनालय आणि अपंग आयुक्तालय, यांचेमार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच अपंगाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व पुर्नवसनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यालयांच्या माध्यमातून करण्यात येते.
योजना :-
• अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे.
• स्वंयसेवी संस्थामार्फत चालविणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान
• अांतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य.
• मॅट्रिक पूर्व शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने.
• माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती.
• शाहू – फुले – आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान.
• अपंग शिष्यवृत्ती.
• अपंग कल्याण योजना
• शासकीय संस्थामधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण.
• स्वयंसेवी संस्थामार्फत अपंगांना विशेष शिक्षण देणाऱ्या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळा.
• शालांत पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
• शालांत परिक्षेत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
• स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल).
• अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे.
• अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
• अपंग – अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रेात्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.
• मतिमंद बालगृहे योजना.
• मातोश्री वृध्दाश्रम योजना.
• वृध्दाश्रम.
• व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्र (केंद्र पुरस्कृत).
• वैयक्तिक लाभ.
कार्यालयीन मंजुर पदे :-
अनु. क्र. |
संवर्ग. क्र. |
पदनाम |
मंजुर पदे |
भरलेली पदे |
रिक्त पदे |
रिक्त कधीपासून आहे त्याचा तपशील |
१ |
वर्ग १ |
समाज कल्याण अधिकारी |
0१ |
01 |
0 |
|
२ |
वर्ग ३ |
सहाय्यक लेखाधिकारी |
0१ |
0१ |
— |
— |
३ |
वर्ग ३ |
अधिक्षक |
0१ |
01 |
0 |
|
४ |
वर्ग ३ |
वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता |
0१ |
01 |
0 |
|
५ |
वर्ग ३ |
सहाय्यक सल्लागार |
0१ |
0१ |
— |
— |
६ |
वर्ग ३ |
समाज कल्याण निरिक्षक |
0५ |
05 |
0 |
|
७ |
वर्ग ३ |
वरिष्ठ लिपिक |
02 |
— |
02 |
दि. २९/१२/१६ पासून पदोन्नती मध्ये रिक्त |
८ |
वर्ग ३ |
कनिष्ठ लिपिक |
0१ |
0१ |
— |
— |
९ |
वर्ग ३ |
प्रक्षेपक (सिनेमा ऑपरेटर) |
0१ |
0 |
01 |
दि. ३१/१२/18 पासून स्वेच्छा निवृत्तीमुळे रिक्त |
१० |
वर्ग ३ |
वाहन चालक |
0१ |
— |
0१ |
दि. ३१/१२/१६ पासून स्वेच्छा निवृत्तीमुळे रिक्त |
११ |
वर्ग ४ |
शिपाई |
0३ |
— |
0३ |
सद्द्यस्थितीत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कर्मचारी कार्यरत आहेत |
|
|
एकूण पदे |
18 |
11 |
07 |
|
समाज कल्याण समिती :-
श्रीमती नेमावली उद्धल माटे – सभापती |
विभाग प्रमुख – सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
१ |
स. श्रीमती शांता जोधुजी कुमरे |
सदस्या |
२ |
स. श्री महेंद्र नारायण डोंगरे |
सदस्य |
३ |
स. श्रीमती मुक्ता विष्णू कोकडडे |
सदस्या |
४ |
स. श्री सुभाष राजेराम गुजरकर |
सदस्य |
५ |
स. श्रीमती मेघा गुलशन मानकर |
सदस्या |
६ |
स. श्री शंकर राजेराम डडमल |
सदस्य |
७ |
स. श्रीमती ममता सुरेश धोपटे |
सदस्या |
८ |
स. श्री राजकुमार दौलत कुसूंबे |
सदस्य |
९ |
स. श्री बाबासाहेब देशमुख |
सदस्य |
ऑनलाईन शिष्यवृत्ती योजना :-
इयत्ता 5 ते 7 व इयत्ता 8 ते 10 वी मध्ये शिकणा-या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
इयत्ता 8 वी ते 10 वी अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती.
अस्वच्छ व्यवसाय काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती.
माहितीचा अधिकार :-
जन माहिती अधिकारी :- श्री. प्रफुल गोहते, कार्यालयीन अधिक्षक
अपिलीय अधिकारी :- श्री किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी
जिल्हा परिषद नागपूर.
” विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना ”
शिष्यवृत्ती योजना
१ ) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना :-
उद्दिष्ट :
इयत्ता ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय (अनु. जाती / वि. जा./ भ. ज./ वि. मा. प्र.) मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने इयत्ता ५ वी ते ७ वी ची सन १९९६ व इयत्ता ८ वी ते १० वी ची २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अटी व शर्ती :
१. उत्पन्न व गुणांची अट नाही.
२. अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
३.वर्षातून तीन वेळा म्हणजे २६ जुनं, २२ सप्टेंबर आणि ३ जानेवारी या तारखांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
शिष्यवृत्ती चे स्वरूप :
इयत्ता |
शिष्यवृत्ती दर |
कालावधी |
५ वी ते ७ वी |
रु. ६०/- दरमहा |
१० महिने |
५ वी ते ७ वी |
रु. १०० /- दरमहा |
१० महिने |
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
२. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.
२) अस्वच्छ व्यवसाय जाणाऱ्या पालकांच्या पालकांना शिष्यवृत्ती योजना:-
उद्दिष्ट:
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे साठी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.
अटी व शर्ती :
१. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना अनुज्ञेय.
२. ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.
३. ही योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतेही उत्पन्नाचीची अट नाही.
४. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच , नगरपालिका मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त / उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
५. अनुसूचित जाती मध्ये केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला अनिवार्य.
लाभाचे स्वरूप :
१. इ. १ ली ते २ री च्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. ११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु. ७५०/- देय आहे.
२. इ. ३ री ते १० वी वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु ७५०/- दरमहा देय आहे.
३.वस्तीगृहात राहणाऱ्या इ. ३ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांना रु ७००/- व तदर्थ अनुदान रु. १०००/- देय आहे.
संपर्क :
१. संबंधित शाळेत मुख्याध्यापक
२. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद.
3) भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना :-
उद्दिष्ट :
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे. सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
अटी व शर्ती :
१. शासकीय मान्यताप्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांस लागू राहील.
२. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा पालकांना उत्पन्नाची मर्यादा रु २ लाख इतकी असावी.
३. विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरूप : १० महिन्यासाठी
अ. क्र. |
योजना |
वसतिगृहात न राहणारे |
वसतिगृहात राहणारे |
१ |
शिष्यवृत्तीचे दर(प्रतिमाह) |
रु. १५०/- |
रु. ३५०/- |
२ |
पुस्तके व तदर्थ अनुदान(वार्षिक) |
रु. ७५०/- |
रु. १०००/- |
वरील प्रमाणे शिष्यवृत्तीशिवाय विनाअनुदानित शाळेतील अपंग विद्यार्थ्यांकरिता अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
अ. क्र. |
भत्त्याचा प्रकार |
मासिक भत्त्याची रक्कम |
१ |
अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता रु) |
रु. १६०/- |
२ |
वसतिगृहात न राहणारे अपंग विद्यार्थ्यांकरिता वाहतूक भत्ता./- |
रु. १६०- |
३ |
अपंग विद्यार्थ्यांच्या सोबत्यांकरिता भत्ता. |
रु. १६०/– |
४ |
अपंग विद्यार्थ्यांकरिता मदतनीसकरीत भत्ता |
रु. १६०/– |
५ |
मंदबुद्धी विद्यार्थ्यांकरिता शिकवणी भत्ता रु. २४०/- |
रु. २४०/– |
अर्ज करण्याची पद्धत:
शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई दिनांक 17.12.2018 व दिनांक 16.02.2019 नुसार सन 2018-19 करिता या शिष्यवृत्ती चे अर्ज ऑफलाईन पद्धतिने स्विकारण्यात येत आहेत.
संपर्क:
१. संबंहधत जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
२. समाज कल्याण अधिकारी (वर्ग-२) बृहमुंबई.
४) गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना :-
उद्दिष्ट :
१. अनु. जाती व जमाती (अनु. जाती / वि. जा./ भ. ज./ वि. मा. प्र.) मुलामुलीना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
२. शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.
३. अनु. जाती व जमाती (अनु. जाती / वि. जा./ भ. ज./ वि. मा. प्र.) प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी.
अटी व शर्ती :
१. लाभार्थी हा मान्यताप्राप्त संस्थेचा शिक्षण घेत असावा.
२. लाभार्थी हा अनु. जाती व जमाती अनु. जाती / वि. जा./ भ. ज./ वि. मा. प्र. प्रवर्गातील असावा.
३. लाभार्थी हा वार्षिक परीक्षेत ५०% पेक्षा अधिक गुण घेऊन वर्गात प्रथम/ द्वितीय क्रमांकाचे उत्तीर्ण असावा.
लाभाचे स्वरूप :
अ. क्र. |
इयत्ता |
प्रतिमाह |
१० महिने |
१ |
५ वी ते ७ वी |
२० |
२० |
२ |
८ वी ते ९ वी |
४० |
४०० |
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद
२. संबंधित शाळेने मुख्याध्यापक/ प्राचार्य.
५) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्या वेतन :-
उद्दिष्ट:
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
अटी व शर्ती :
१. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
२. . विद्यार्थी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारा असावा.
३. पालकाचे वार्षिक उत्पन्न…….पेक्षा जास्त नसावे.
लाभाचे स्वरूप :
१. संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा रु. ६०/- विद्यावेतन देण्यात येते त्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून दरमहा रु. ४०/- पूरक विद्यावेतन देण्यात येते.
२. तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही त्यांना समाज कल्याण विभागाकडून दरमहा रु. १००/- विद्यावेतन देण्यात येते.
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
२. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
दिव्यांगांसाठी योजना
१ ) शालान्तपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :-
उद्दिष्ट:
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
निकष :
१. इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण घेणारे अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष शाळेतील मतिमंद विद्यार्थी.
२. विद्यार्थाकडे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र असावे.
३. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा झालेला नसावा.
लाभाचे स्वरूप :
अ. क्र. |
इयत्ता |
शिष्यवृत्ती दर रुपये दरमहा |
१ |
इयत्ता १ ली ते ४ थी(कर्ण बधिर पायरीवर्गापासून) |
रुपये १०० /- |
२ |
इयत्ता ५ वी ते ७ वी |
रुपये १५० /- |
३ |
इयत्ता ८ वी ते १० वी. |
रुपये २०० /- |
४ |
मतिमंद मानसिक विकलांग (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळेतील) |
रुपये १५० /- |
५ |
अपंग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी |
रुपये ३०० /-
|
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज गायलं अधिकारी
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
२) शालांत परिक्षेत्तर शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :-
उद्दिष्ट:
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
अटी व शर्ती :
१. इयत्ता १० वी पुढील शिक्षण घेणार अंध , कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
२. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा.
लाभाचे स्वरूप :
अ. क्र. |
अभ्यासक्रमाचा गट |
वसतिगृहात राहणारे
दरमहा |
वसतिगृहात न राहणारे
दरमहा |
१. |
गट अ(वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, अग्रीकलचर, व्हेटरनरी मधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण) |
१२००/- |
५५०/- |
२. |
गट ब (अभियांत्रिकी तांत्रिक, स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम) |
८२०/- |
५३०/- |
३. |
गट क(कला, विज्ञान, वाणिज्य, मधील पदव्युत्तर) अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम). |
५३० |
८२० |
४. |
गट ड (द्वितीय वर्ष व त्यानंतर पदवीपर्यंत चा अभ्यासक्रम) |
५७० |
३०० |
५. |
गट इ (११ वी, १२ वी व पदवी प्रथम वर्षाचा अब्भ्यासक्रम |
३८० |
२३० |
|
शिष्यवृत्तीचा रक्कमेबरोबर विद्यापीठांना / शिक्षण शुल्क समितीने मान्य केलेले शिक्षण शुल्क , अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता प्रकल्प टंकलेखन खर्च अभ्यासदौरा खर्च देण्यात येते. |
संपर्क:–
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
३) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना लघु-उद्योगांसाठी वित्तीय सहा :-
उद्दिष्ट : अपंग व्यक्तींना लघु-उद्योगांसाठी वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे.
अटी व शर्ती.
१. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे.
३. अपंग व्यक्तीचे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
४. वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असावे.
लाभाचे स्वरूप :
१. रुपये १.५० लाखांपर्यंतच्या व्यावसायिक ८०% बँक मार्फत कर्ज व २० % अथवा कमाल रुपये ३०,०००/- सबसिडी स्वरूपात अर्थसहाय .
संपर्क:
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर / उपनगर.
४) शारीरिकदृष्ट्या अपंगांना त्याचे अपंगत्वानुसार कृत्रिम अवयव पुरविणे :-
उद्दिष्ट: अपंगाचे शारीरिक पुनर्वसन करणे.
निकष :
१. अपंग व्यक्तीचे किमान ४० व त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
२. अपंग व्यक्तीचे दरमहा दरमहा उत्पन्न रुपये २०००/- पेक्षा कमी असावे.
३. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
४. उपकरणाची / साधनांची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे शिफारीसपात्र असावे.
लाभाचे स्वरूप :
१. अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबड्या, कॅलिपर्स इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठ्या,इयत्ता १० वी पुढील अंध व्यक्तींना शिक्षणासाठी टेप रेकॉर्डर, कर्णबधिरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनांसाठी रुपये ३००० रु- पर्यंतचे अर्थसहायय उपलब्ध करून देणे.
संपर्क:
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. साहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
५) अपंग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देणे :-
उदिद्ष्टे :
१. अपंग व अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देणे
२. विवाहासाठी आर्थिक सहाय्या करणे
अति व शर्ती :
१. अर्जदाराचे अपंगत्व किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
२.अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
लाभाचे स्वरूप :
किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधु किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधु किंवा वाराशी विवाह केल्यास अथवा अपंगत्व नसलेल्या वधु किंवा वराने अपंगत्व असलेल्या वधु इन्वा वाराशी विवाह केलेल्या या योजनेतून खालीलप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येईल.
अ) रुपये २५०००/- चे बचत प्रमाणपत्र
ब) रुपये २००००/- रोख स्वरूपात
क) रुपये ४५००/- संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरीदीसाठी देण्यात येईल
ड) रुपये ५००/- स्वागत समारंभात कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.
संपर्क :
१. संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. साहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , मुंबई शहर /उपनगर
वृद्ध कलावंत मानधन योजना
उदिद्ष्टे :
१. साहित्य व कला क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पात्र वृद्ध कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी शासनातर्फे दरमहा अनुदान देण्याची योजना राबविलेली आहे. त्यासाठी कलावंताचे वय ५० वर्ष, उत्पन्नाचं दाखला व राज्यस्तरीय कार्यक्रम सादर करल्याबाबतचे ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. दरवर्षी ६० कलावंताची अनुदानासाठी शिफारस करण्यात येते.
अ.क्र. |
श्रेणी |
श्रेणी नुसार मानधन रक्कम |
१ |
अ श्रेणी |
दरमहा २१००/- रुपये मानधन |
२ |
ब श्रेणी |
दरमहा १८०० /- रुपये मानधन |
३ |
क श्रेणी |
दरमहा १५०० /- रुपये मानधन |
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद.
जिल्हा परिषद २० टक्के सेस फंड (वैयक्तीक लाभाची योजना )
उदिद्ष्टे :
जिल्हा परिषदेच्या ऊतपन्नातून सदर योजना राबविल्या जाते. समाज कल्याण समितीच्या शिफारसीनुसार मागासवर्गीय विध्यार्थी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व बेरोजगारांसाठी वैयक्तिक योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर लाभाथरना साहित्य वाटप केले जाते.
लाभाचे स्वरूप :
१. शालेय शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विध्यार्थी विद्यार्थिनींना लेडीज सायकल पुरविणे .
(टीप:- शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेपासून अंतर किमान २ कि मी असणे आवश्यक )
२. मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन पुरविणे
( अनु. जाती / वि.जा./भ./ज/वि. मा .प्र)
(टीप:- शिवणकला प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र आवश्यक )
३. मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री पुरवणे.
४. मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोटर पंप पुरवणे.
५. मागासवर्गीय शेतकऱ्यांना एच.डी.ई.पी पाईप पुरवणे.
६. मागासवर्गीय शेतकऱ्यांना ऑईल इंजिन पुरवणे.
( टीप:- मागासवर्गीय शेतकऱ्यांना वरील लाभासाठी अर्जासोबत शेतीचा ७/१२,८(अ) व नकाशा तसेच जातीचे प्रमाणपत्र आवश्यक)
७.मागासवर्गीय बेरोजगारांना बिछायत केंद्र लाऊडस्पिकर मंडप डेकोरेशन देणे.
(टीप:- ग्रामसेवक याचे अर्जदार बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक)
८.मागासवर्गीय वस्तीची सुधारणा
९. मागासवर्गीय बेरोजगारांना शेवई मशीन पुरविणे .
१०.मागासवर्गीय बेरोजगारांना एअर कॉम्प्रेसर पुरवणे.
११.ग्रामीण भागातील मागासवर्गीय सोलर कंदील पुरविणे.
( टीप:- वरील सर्व योजनांचे प्रस्ताव पंच्यात समित्या मार्फत स्वीकारले जाते)
अनु-जाती व नवबोध्द्द घटकाच्या वस्तीचे विकास करणे योजना.
उदिद्ष्टे :
अनुसेचित जाती व नवबोध्द्द घटकाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक दलित वस्त्यांमध्ये नळ पाणी पुरवठा, गटारे, स्वच्छता विषयक सोयी. जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, इत्यादी पायाभूत व्यवस्था करून त्याचा सर्वागीण विकास कारण्यासठी हि योजना आहे.
लाभाचे स्वरूप :
शासन निर्णय दिनांक ०५ डिसेम्बर २०११ अन्वाये लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबोध्द्द घटकांच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रेमात खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. |
लोकसंख्या |
अनुदान रुपये |
१ |
१० ते २५ |
२ लक्ष |
२ |
२६ ते ५० |
५ लक्ष |
३ |
५१ ते १०० |
८ लक्ष |
४ |
१०१ ते १५० |
१२ लक्ष |
५ |
१५१ ते ३०० |
१५ लक्ष |
६ |
३०१ च्या पुढे |
२० लक्ष |
१ या योजने अंतर्गत घ्यावयाच्या कामाचा सन २०१३ पासून पुढील पाच वर्षात बृहत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तो संबंधित जिल्हयात संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
२. बृहत आराखड्यमध्ये नमूद असलेल्या कामाचा प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रासह गरपंचायतीने तयार करून गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे सादर करणे अपेक्षित आहे.
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
आंतर जातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान
उदिद्ष्टे : राज्यातील जातीयता भेदाभेद कमी करण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्याना अर्थसहया देणे हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
लाभाचे स्वरूप :
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू , जैन , लिंगायत , बौद्ध , शीख या पैकी दुसरी अशनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गतील विवाहित जोडप्याना या योजने अंतरर्गात फेब्रुवारी २०१० नंतर आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रुपये ५००००/- अर्थसहाया देण्यात येते. सदर धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येतो.
संपर्क :
१. संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद / समाज कल्याण अधिकारी वर्ग -२, बृहमुंबई .(मुंबई क्षेत्रासाठी )
अनुदानित वृद्धाश्रमे व व्यसनमुक्ती
उदिद्ष्टे :
१. वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व सुखसमाधानासाठी घालावीता यावी या करीत योजना सुरु करण्यात आली.
२. व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्ती करणे.
लाभाचे स्वरूप :
१ . शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृद्धाश्रम चालविण्यात योजना सन १९६३ पासून कार्यानेवित आहे.
२. संस्था हि संस्थ नोंदणी अधिनियम १९६० व सार्वजनिक विशवस्त अधिनियम १८५० अंतर्गत नोंदणीकृत असावी.
३. सदर वृद्धाश्रम अन्न,वस्त्र ,निवारा, औषधोपचार ,करमणूक, मनोरंजनाची सोया मार्फत करण्यात येते.
४.वृद्धाश्रमात निराधार व निराश्रित ६० व निराश्रित ६० वर्ष वरील पुरुष व ५५ वर्ष वरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो.
५.प्रत्येक वुद्धामागे परिपोषण अनुदान १ जानेवारी २०१२पासून प्रतिमाह रुपये ६३०/- ऐवजी रुपये ९००/-या प्रमाणे
देण्यात येते.
६.वुद्धीश्रामाची प्रवेश संख्या कमीत कमी २५ आहे तसेच प्रत्येक वुद्धीमागे इमारत बांधकाम अनुदान रुपये ७५०/- एकदाच दिले जाते.
७.मान्यता प्राप्त व्यसनमुक्ती केंद्रास केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
२.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
दिव्यांगांसाठी शासकीय संस्था
१. शासकीय अपंगांची कर्मशाळा:
या संस्थेमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग व मूकबधिर लाभार्थ्यांना संगणक प्रशिक्षण,सुतारकाम,आर्मचर वाईडींग व शिवणकला या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येते.
२.शासकीय वहु अपंग मुलाचे समीश्र केंद्र:
या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग व मूकबधिर मुलांना शिक्षणाकरिता प्रवेश देण्यात येते.
३.शासकीय अपंग बाल विकास गृह:
या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग विद्यार्थ्यांना शिक्षण व पुर्नसनासाठीप्रवेशदेण्यात येते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांगांसाठी विशेष शिक्षण देणा-या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळा
उदिद्ष्ट:
१.विशेष शाळा ६ ते १८ वयोगटातील अपंग विदयार्थ्यांना मोफत विशेष शिक्षण
२. विशेष कर्मशाळा १८ ते ४५वयोगटातील अपंग किंवा प्रौढ़ व्यक्तींना मोफत विशेष प्रशिक्षण
लाभाचे स्वरूप:
१.विशेष शाळा- अंध,मूकबधिर,मतिमंद, अस्थिव्यगं विदयार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ,यासह निवास व भोजनजी व्यवस्था करणे.
२.विशेष कार्यशाळा- अंध,मूकबधिर,मतिमंद, अस्थिव्यगं प्रौढ़ व्यक्तींना विशेष प्रशिक्षणाद्वारे अपंगत्वानुसार विविध व्यवसायाचे विशेष प्रशिक्षण देणे.यासह मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करणे.
स्वयंसेवी संस्थाना अर्थसहा:
वेतन – कर्मचारी आकृतिबंधाप्रमाणे मान्य कर्मचाऱ्यांची १०० टक्के वेतन खर्च.
वेतनेत्तर – वेतन खर्चाच्या ८ टक्के मयादित.
इमारत – सार्वजनिक बांधकाम व अस्थिव्यगं प्रवगातील प्रति विद्याथीं दरमहा ९००/- व मतिमंद प्रवगातील प्रति विद्याथीं रुपये९९०/-प्रमाणे १० महिन्यांकरिता.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
२.सहाय्य्यक आयुक्त,समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यासाठी येणा-या अनुदानित वसतिगृहांनाअनुदान योजना
उदिद्ष्ट:
अनु.जाती,अनु जमाती,विजाभज,विमाप्र,इमाव,अनाथ व निराश्रीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून त्यांना निवास,भोजन,अंथरून-पांघरून इ.सोई सुविधा मोफत देण्यात येतात.जिल्ह्यात १०० वसतीगृह असून
वर्ग ५ ते १२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
राखीव ३ टक्के जिल्हा निधी मधुन अपंगासाठी राबविण्यात येणा-या योजना
उदिद्ष्ट:
१.जिल्हा निधी अंतर्गत अपंग- अपंग व्यक्ती विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देणे.(रु.२५,०००/-)
२.अपंगांना संगणक प्रशिक्षण/ व्यवसाय प्रशिक्षण मोफत देणे.
३.अपंग पुनर्वसन केंद्र थेरपी सेंटर सुरु करणे.
४.बेरोजगार अपंगांना व्यवसायासाठी झेरॉक्स मशीन पुरविणे.
५.अपंगांना तीनचाकी सायकल/ट्रायसिकल पुरविणे (४०% अपंगत्त्व असणे आवश्यक)
६.मतिमंद व्यक्ती करिता निरामय योजनेचे हप्त भरणेसाठी अर्थसहाय्य करणे.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
बॅटरीवर चालनारी तिन चाकी सायकल PDF FILE DOWNLOAD करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.
m.t pdf file
मान्यवर वृध्द साहित्यीक व कलावंत यांची मंजुर निवड यादी.
E-Tender
सेवा जेष्ठता यादी