कृषि विभाग

NAGPURZP    24-Apr-2020
Total Views |
खाते प्रमुखाचे नाव श्री जयंत कौटकर
खाते प्रमुखाचे पदनाम कृषि विकास अधिकारी
विभागाचा दूरन्वनी क्रमांक 0712-2562116
विभागाचा इ-मेल [email protected]

प्रस्तावना :-
भारत हा कृषि प्रधान देश असून देशाच्या थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक असून त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतक-यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतक-यांमध्ये जाणीव ,जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन कृषि विभाग, जिल्हा परिषद, नागपूर कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ९,८१,००० हेक्टर असून निव्वळ पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र ५,९३,८०० हेक्टर आहे. खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ४,६६,००० हेक्टर असून रब्बी, उन्हाळी पिकाचे क्षेत्र ८०,६०० हेक्टर आहे. जिल्ह्यात एकूण १३ पंचायत समित्या असून त्यापैकी नागपूर, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर या तालुक्यात मुख्य पिके कापूस, ज्वार, तूर , सोयाबीन, भुईमुग असून रामटेक, मौदा, पारशिवनी, भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यात भात, मिरची व सोयाबीन हि मुख्य पिके आहेत. जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ११३८.८६ मी.मी. असून १ जून ते ३१ आक्टोंबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ८३४ मी.मी. आहे. कृषि विभाग हा जिल्हा परिषदेचा एक महत्वपूर्ण विभाग असून कृषि विकास अधिकारी हे सद्स्य सचिव म्हणुन या विभागाचे काम पाहतात. शेतक-याचा सर्वांगीण विकास करून त्यांचा सामाजीक व आर्थिक स्तर उंचविण्याचे दृष्टिने वैयक्तीक लाभाच्या व लोकोपयोगी योजना सातत्याने राबविल्या जातात. या योजना ग्रामीण भागातील तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या विभागामार्फत केल्या जाते. अनुसुचित जाती / नव बौद्ध घट्कातील शेतक-याना अर्थसहाय्य देण्याची योजना
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच आदिवासी उपाय योजना (ओ.टी.एस.पी.) व टी.एस.पी. योजना या विभागामार्फत राबविण्यात येतात. शेती विषयक निविष्ठा पुरवठा करणा-या कृषि सेवा केंद्राला परवाना देण्याचे तसेच जिल्ह्यात प्राप्त रासायनिक ख़तांची खात्री करून त्याचे अनुदानासाठी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सुध्दा जिल्हा परिषदेतील कृषि विभागाची आहे. तसेच पिक संरक्षण उपकरणे, सुधारीत कृषि औजारे वाटप, पिक संरक्षण योजना, राष्ट्रिय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम योजना, जिल्हा परिषद सेस फन्ड योजना सातत्याने राबविण्यात येतात. बि-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके या बाबतीत गुणनियंत्रण कामांची जबाबदारी कृषि विभाग, जिल्हा परिषद, नागपूर मार्फत पार पाडण्यात येते.
नागरिकांची सनद
 

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव हुद्दा सेवा पुरविण्याची विहित मुदत सेवा मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकायांचे नाव
1 कृषि विभागातील सर्व योजनांचे नियंत्रण व अंमलबजावणी अधिकारी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर वार्षिक अति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
2 अनुसुचित जाति / नवबौद्ध (विशेष घटक योजना) तसेच आदिवासी उपाय योजना, क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील शेतक-यांना आर्थिक उन्नतीसाठी 100 टक्के अर्थ सहाय्य देण्याची योजना (लाभार्थ्यांची निवड करणे) अ) नविन विहिर रु 1,00,000/- अनुदान कमाल मर्यादा ब) विहिरि व्यतिरिक्त इतर घटका करिता रु. 50000/- चे अनुदान मर्यादित जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
3 बियाणे, खते, किटक नाशकाचे परवाने प्रस्ताव प्राप्त झाल्यावर परवाने तपासणी व मंजुरी प्रस्तावित करणे  (मोहिम अधिकारी) 45 दिवसाच्या आत कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
3 (अ) निविष्ठा बाबत तक्रारी प्राप्त होताच त्याची चौकशी करणे ख़तांची 20% तपासणी करून अहवाल तयार करणे जिल्हा कृषी अधिकारी (मोहिम अधिकारी) 15 दिवसाच्या आत कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
3 (ब) निविष्ठाचे (ख़ते, बियाणे, किटक नाशके) नमुने काढणे (मोहिम अधिकारी) मासिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
3(क) गुणनियंत्रक विषयक कामे करणे तथा निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करणे (मोहिम अधिकारी) मासिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
4 (अ) दैनंदिनी पर्जन्यमान अहवाल विभागीय कृषि सहसंचालक,नागपूर विभाग नागपूर यांचेकडे सादर करणे नेट वर आकडे भरणे कनिष्ठ सहाय्यक 1 जुन ते 31 आक्टो प्रत्येक वर्षी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
4(ब) खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामा अंतर्गत बियाणे पुरवठा वाटपाचा अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर कारणे कनिष्ठ सहाय्यक साप्ताहिक कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
4(क) केंद्र / राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करणे कनिष्ठ सहाय्यक मासिक / वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
4(ड) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर कारणे कनिष्ठ सहाय्यक मासिक / वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
5 बायोगॅस विकास कार्यक्रम पंचायत समिती कडुन निवड झालेल्या लाभार्थ्याना शासनाकडून प्राप्त अनुदान पंचायत समिती स्तरावर वितरीत करणे. मासिक प्रगती अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करणे कनिष्ठ सहाय्यक वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
6 पुरस्कार योजना शेतीनिष्ठ , कृषिरत्न जिजामाता कृषिभूषण, शेतीमित्र डॉ पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार   वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
7 सेस फ़ंड योजना शेतक-याना कृषि उपयोगी साहित्य (उपकरणे, औजारे, ताडपत्री) वाट्प करणे कृषि अधिकारी वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
7(अ‍) पंचायत समितीने शेतक-यांचे अर्ज जि.प. कृषि विभागाला सादर करणे कृषि अधिकारी प्रत्येक वर्षी ऑगष्ट पर्यंत कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
7(ब) प्राप्त अर्जाची छाननी करून निकषा प्रमाणे शेतक-यांची निवड करून कृषि समितीची मंजूरी प्राप्त करून संबंधीत लाभार्थ्याना 50% अनुदानावर साहित्य वाटप करणे कृषि अधिकारी प्रत्येक वर्षी 31 मार्च पर्यंत कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
8 नैसर्गिक आपत्ती सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी व कृषि आयुक्तालयास सादर करणे कृषि अधिकारी 25 दिवसांचे आत कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9 गुणनियंत्रण विषयक काम (ख़ते, बियाणे, किटकनाशके) मोहीम अधिकारी वार्षिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9(अ) निविष्ठा परवाणे तपासणी करणे (ख़ते, बियाणे, किटकनाशके) मोहिम अधिकारी साप्ताहिक / पंधरवाडी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9(ब) अप्रमाणिक निविष्ठाबाबत व निविष्ठा तक्रारी संबंधीत कार्यवाहि करणे मोहिम अधिकारी मासिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9(क) ख़रीप व रब्बी हंगामातर्गत खतांचे नियोजन करणे मोहिम अधिकारी मासिक / पंधरवाडी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9(ड) खतांचा पाक्षिक व मासिकअहवाल सादर करणे मोहिम अधिकारी मासिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
9(इ) ख़ते 20% तपासणी अहवाल कृषि आयुक्तालय, पुणे येथे सादर करणे. मोहिम अधिकारी मासिक कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर

कृषि विभाग, जिल्हा परिषद, नागपूर योजना
1) जि. प. निधी योजना – 50% अनुदानावर (DBT पद्धतीने) पिक संरक्षण औजारे/औषधे, सुधारित कृषि औजारे, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल/पेट्रोकेरोसिन/विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व प्लास्टिक ताडपत्री इ. चे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट हस्तांतरण करणे.
 
लाभार्थी निवडीबाबतचे निकष
1) शेतकऱ्यांचे नावे शेत जमीन असावी.
2) शेतकरी अल्प / अत्यल्प भू-धारक असला पाहिजे.
 
आवश्यक कागदपत्रे –
1) संबंधीत गट विकास अधिकारी व कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज
2) जमीन धारणेचा 7/12 व 8 अ चा उतारा
3) विद्युत मोटार यासाठी वीजबील झेरॉक्स प्रत आवश्यक
 
लाभार्थीची निवड पध्दत–
शेतकऱ्याने गट विकास अधिकारी यांचेकडे कागदपत्रासह अर्ज करावा. कागदपत्रांची तालुका पातळीवर छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी कृषि समिती सभेमध्ये मंजूरीसाठी पाठविण्यात येते.
 
मंजुरीची प्रक्रिया व अधिकार –
गट विकास अधिकारी यांचे तर्फे कृषि विकास अधिकारी यांचेमार्फत कृषि समितीकडे लाभार्थी निवडीचे पुर्ण अधिकार आहेत.
 
प्रत्यक्ष मदत/साध्यता– प्लास्टिक ताडपत्री
एच डी पी ई पाइप
पीव्हीसी पाईप
किटक व बुरशीनाशक औषधे
डिझेल/पेट्रोकेरोसीन/विद्युत मोटार पंपसंच
नॅपसॅक /एचटीपी/पॉवर स्प्रे पंप
प्लॉस्टिक क्रेट्स
शेतकऱ्यांना उपरोक्त बाबींच्या खरेदी किंमतीच्या 50% अनुदानावर लाभ दिला जातो.
 
लाभार्थी हिस्सा – योजनानिहाय अनुदान वजा जाता 50% लाभार्थी हिस्सा.
 
कार्यवाही – जिल्हा परिषद निधीतून शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावर 50% अनुदानावर कृषि औजारे व साहित्याचे वाटप केले जाते.
 
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
लाभार्थी पात्रतेच्या अटी
१. लाभार्थी हा अनुसूचीत जाती / नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.
२. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
३. शेतकऱ्याचे नाव जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.
४. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
५. अनुदान वितरणासाठी लाभार्थींचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
६. दारिद्र्यरेशेखालील लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.
७. दारिद्र्यरेशेखालील नसलेले अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. १५००००/- पेक्षा जास्त नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यास ते पात्र असतील.
८. विहिरीचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
९. प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावे.
१०.लाभार्थींच्या ७/१२ वर तसेच प्रत्येक्षात विहीर असल्यास त्याची योजनेसाठी निवड करता येणार नाही.
११. लाभ धारकाकडे तलाठी यांचा स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला आवश्यक आहे.
१२. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील आवश्यक.
१३. यापूर्वी राज्य शासन/केंद्र शासन, जिल्हा परिषदेच्या निधीतून सिंचन विहीर या सुविधेचा लाभ घेतलेला नसावा.
१४. इतर योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिल्येल्या अपूर्ण विहिरीचे काम पूर्ण करण्या साठी ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही
 
सदर योजनेअंतर्गत खालील बाबींचा लाभ देण्यात येतो

अ.क्र. बाब अनुदान मर्यादा (रुपये) शेरा
नवीन विहीर रु. २५०००००/-  
जुनी विहीर दुरुस्ती रु. ५००००/-  
इनवेल बोअरींग रु. २००००/-  
पंप संच रु.२५०००/-  
वीज जोडणी आकार रु. १००००/-  
शेततळ्याचे प्लस्टिक अस्तरीकरण रु. १०००००/-  
सुक्ष्म सिंचन संच मंत्री मंडळ उपसमितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार  

टिप :- वरील बाबींपैकी नवीन विहीर व त्यासोबत पंपसंच, वीज जोडणी आकार, आणि सूक्ष्म सिंचन संच या घटकांचा लाभ देण्यात येतो. नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा व त्या सोबतच्या पॅकेजचा लाभ घेता येणे शक्य आहे.
3) आदिवासी उपयोजना ( क्षेत्राअंतर्गत ) व आदिवासी (क्षेत्राबाहेरील) अभिकरण योजना
उद्देश – अनुसूचीत जमाती या संवर्गातील शेतकऱ्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणून त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती करणे.
 
योजनांचे क्षेत्र – आदिवासी उपयोजना ( क्षेत्राअंतर्गत ) ही केवळ रामटेक तालुकयातील काहीगावा-करीता असून, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना ही नागपूर जिल्हयाकरिता आहे. लाभार्थी निवडीचे निकष –
1) लाभार्थी अनु. जाती / जमाती संवर्गातील असावा. (प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र)
2) शेतकऱ्याचे नावावर जमिन असावी.( कमाल मर्यादा – 6 हेक्टर)
3) शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.25,000/- पेक्षा कमी असावे.
4) शेतकऱ्यास या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
5) लाभार्थी स्वेच्छेने शेतीची कामे करण्यास व योजनेत सहभागी होणेस उत्सुक असावा.
 
लाभार्थी निवडीचे अधिकार– अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीकडे लाभार्थी निवडीचे पुर्ण अधिकार आहेत. पंचायत समीती कडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांस लाभार्थी निवड समिती मान्यता देते.
निधीची उपलब्धता –
या योजना राज्य पुरस्कत असून संपुर्ण निधी राज्य शासनाकडून प्राप्त होतो. आवश्यक कागदपत्रे –
1) गट विकास अधिकारी यांचे नावे अर्ज.
2) 7/12 व 8/अ चा तलाठयाकडील उतारा
3) प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र.
4) प्राधिकृत अधिकाऱ्याचे उत्पन्नाचा दाखला किंवा बीपीएल लाभार्थी असलेबाबत प्रमाणपत्र.
 
अनुदान – योजनेमध्ये निवड झालेनंतर लाभार्थ्यास दोन वर्षात जास्तीत जास्त रु‎. 1,00,000/-(नविन विहिर करणाऱ्यास) किंवा रु‎. 50,000/- इतर बाबींसाठी लाभ देता येतो.
 
लाभार्थीना द्यावयाच्या बाबी –
अ. क्र. बाब अनुदानाची मर्यादा रु.
1 निविष्ठा वाटप (1 हेक्टर मर्यादेत)रु.5,000/- च्या मर्यादेत
2 पिक संरक्षण / शेतीची सुधारीत औजारे रु.10,000/- च्या मर्यादेत
3 जमिन सुधारणा ( 1 हेक्टर मर्यादेत) मृद संधारण निकषानुसार रु.40,000/- च्या मर्यादेत
4 बैलजोडी / रेडेजोडी (स्थानिक बाजार भावानुसार) रु.30,000/- च्या मर्यादेत
5 बैलगाडी रु.15,000/- च्या मर्यादेत
6 जुनी विहिर दुरस्ती रु.30,000/- च्या मर्यादेत
7 इनवेल बोअरींग (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत
8 पाईप लाईन (300 मीटर पर्यंत व (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत
9 पंपसंच रु.20,000/- च्या मर्यादेत
10 नविन विहिर (रोहयो अंतर्गत जवाहर विहीर योजनेनुसार) रु.70,000/- ते रु.1,00,000/- च्या मर्यादेत
11 शेततळे (मृद संधारण निकषानुसार) रु.35,000/- च्या मर्यादेत
12 परसबाग कार्यक्रम (फलोत्पादन विभागच्या निकषानुसार) रु.200/- प्रती लाभार्थी
13 तुषार /ठिबक सिंचन संच पुरवठा रु.25,000/- च्या मर्यादेत
5) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
राष्ट्रीय बायोगॅस योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
 
• योजनेची उद्दिष्टे :-
1.स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे.
2.एल.पी.जी व इतर पारंपारीक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे
3. ग्रामिण भागातील स्त्रीयांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका करणे.
4. सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.
5. बायोगॅस प्रकल्पा पासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे
6. शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे.
7. बायोगॅस चा वापर गॅस चलित इंजिन व रेफ्रिजरेटर मध्ये करून डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे
8. रासायनीक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यास लाभर्थ्यांना प्रवृत्त करणे
 
• योजने अतर्गत लाभार्थीस मिळणारे अनुदान
1) 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. ७०००/-
2) 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 5500/-
3) 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 11000/-
4) 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 9000/-
5) बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणी केल्यास जादाचे अनुदान :- रु.1200/-
6) टर्न कि फी रक्कम प्रति सयंत्र रु. 1500/-
अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
1) गट विकास अधिकारी यांचे नावे विहीत नमुन्यात अर्ज.
2) लाभार्थींच्या नावे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा.
3) लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्यास तलाठ्यांचा दाखला
4) लाभार्थ्याचा पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो
5) ग्रामसेवकांचा 5 ते 6 जनावरे असल्याचा दाखला
लाभार्थीने संयंत्र स्वखर्चाने बांधुन पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करावा
 
• बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती:-
1) गोठयामध्ये बांधुन असणाऱ्या एका दुभत्या जनावरापासून 24 तासात सरासरी 10 ते 15 किलो शेण मिळु शकते व बाहेरुन चरुन येणाऱ्या जनावरापासून सरासरी 7 ते 10 किलेा शेण मिळू शकते तसेच लहान वासरापासून दिवसाला 2 ते 3 किलो शेण मिळू शकते .
2) एक किलो शेणापासून सुमारे 40 लि. बायोगॅस निर्माण होतो तसेच 1 किलो खरकटे पासुन सुमारे 80 लि. गॅसची निर्मिती होते.
3) एका व्यक्तीच्या दैनंदिन गरजेसाठी सुमारे 250 लि. बायोगॅसची आवश्यकता असते.
4) एक घनमिटर बायोगॅस म्हणजे 1000 लि. गॅस
5) पाच लिटरच्या डब्यामध्ये सर्वसाधारणपणे 18 ते 20 किलो शेण बसते.
 
बायोगॅस सयंत्राचे प्रकार व मॉडेल
बायोगॅस सयंत्राचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.
या प्रकारामध्ये लोखंडी टाकीचावापर करण्यात येतो. यातील काही मॉडेल खालील प्रमाणे आहेत.
1) गोबर/ के.व्ही.आय.सी. गॅस संयंत्र :- या प्लँन्टची बांधणी विहिरी प्रमाणे असते या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर केला जातो मात्र लोखंडी टाकी 5 ते 10 वर्षात गंजून निकामी होत असल्याने सध्याच्या काळात या प्रकारचा गॅस प्लँन्टचा वापर कमी झाल्याचे दिसुन येते.
2) वॉटर जॅकेट ( पाणकडयाचा ) गॅस प्लँन्ट :- या प्रकारच्या प्लँन्ट मध्ये लोखंडी टाकीच्या कडेने बांधकाम करुन जॅकेट तयार करुन त्यामध्ये पाणी भरलेले असते यामुळे या प्लँन्ट मध्ये गॅस गळती होत नाही. या प्लँन्ट मध्ये शेण अगर मैला पूर्णपणे टाकीच्या आतच राहतो त्यामुळे प्लँन्ट मधुन जास्तीत जास्त गॅस मिळतो. हा प्लँन्ट फक्त मैल्यावर चालवला तरी थोडी सुद्धा गहाण येत नाही . वॉटर जॅकेट मध्ये पाण्यात मधून मधून जळके तेल (वेस्ट ऑईल) टाकल्यास तेल लेाखंडी टाकीला लागुन टाकी गंजत नाही.
3) गणेश गॅस प्लँन्ट :- या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर करण्यात येत असुन पाचक यंत्र व गॅस टाकी तयार मिळते. पाचक यंत्र लोखंडी पट्टया व बांबुच्या कामटयाचे बनवतात. लोखंडी पट्टया गंजून या प्रकारच्या प्लँन्टचे आयुष्य कमी होण्याचा संभव आहे.
 
घुमट आकाराचा (फिक्स डोम ) बायोगॅस प्लॅन्ट
या प्रकारच्या प्लँन्ट मध्ये लोखंडी टाकीचा वापर करण्यात येत नाही. या प्रकारच्या प्लँन्टची मॉडेल खालील प्रमाणे आहेत.1) दिनबंधु गॅस संयंत्र – या प्रकारचे सयंत्र घुमटा आकार असून संपूर्ण सयंत्र जमीनी खाली असते. या संयंत्राचे बांधकाम विटा पासून किंवा आर.सी.सी. पद्धतीने करता येते. या प्रकारचे मॉडेल पूर्णपणे जमीनी खाली असल्याने अंगणात ही करता येते. या प्रकारच्या संयंत्रात इन लेट व आउट लेट मोठ्या आकाराचे असल्याने शेणा शिवाय इतर सडणारे व कुजणाऱ्या पदार्थाचा तसेच लहान मृत जनावरे (कुत्रे, मांजर, उंदीर,कोंबडी) या वापर करुन गॅस व खत मिळवता येते. प्लँन्टची खोली कमी व घुमटावर मातीचा भराव असल्यामुळे उबदारपण राहतो व गॅस निर्मिती जास्त होते. सध्याच्या काळात या प्लॅन्ट चा वापर जास्त होताना दिसुन येत आहे. 3 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल – खोदकाम मोजमापा प्रमाणे, सिमेंट 16 पोती, खडी (1/2” ¾”) 30 घ. फु. , विटा लहान साईज 1600 नग, वाळु 1.25 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल
2) जनता गॅस प्लॅन्ट :- लोखंडा शिवाय हा प्लँन्ट बनत असल्याने दिर्घायुषी आहे. इनलेट व आउट लेट मोठया आकाराचे असल्याने शेणाशिवाय इतरही सडणारे व कुजणारे पदार्थ प्लँन्ट मध्ये टाकुन गॅस व खत निर्मिती करता येते.
3) मलप्रभ्रा गॅस प्लॅन्ट :- मानवी मलाचा उपयोग करून गॅस निर्मिती या प्लॅन्ट द्वारे करण्यात येते. सार्वजनिक संडास, मोठया सोसायट्यांमधील सेफ्टीक टँक ऐवजी या प्रकारचा गॅस प्लॅन्ट बांधल्यास सार्वजनिक ठिकाणी गॅस निर्मिती करुन तिचा वापर विज निर्मिती साठी करण्यात येवू शकतो. 1 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल – खोदकाम- 8’x 6’ 5’ सिमेंट 15 पोती, खडी (1/2″ 3/4″) 50 घ. फु. , विटा लहान साईज 2000 नग, दगड (8″ 10″) 1/2 ब्रास, रेती 1.5 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल
 
 
 
 
विस्तार अधिकारी (कृषि) यांचे 01 जानेवारी 2021सेवा जेष्टता यादी
 
अंतीम सेवा जेष्ठता यादी 2019