माथनी-

NAGPURZP    10-Mar-2021
Total Views |
 
माथनी- नागपूर जिल्हयातील पंचायत समिती मौदा अंतर्गत माथनी ग्रामपंचायत हे राज्य महामार्गालगतच एक निमशहरी गाव माथनी गावाचा परिसर कन्हान नदीमुळं समृध्द झालेला…
 
माथनी या गावात पिण्याच्या पाण्याची चांगली उपलब्धता असली तरी ग्रामस्थांना अपुरं आणि गढूळ पाणी मिळायचं. त्या मुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दैनंदिन गरजांसाठी अपुर व गढूळ पाणीच वापराव लागत असल्यामुळ महिलांना प्रत्येक वेळी आरोग्यासोबतच ,स्वयंपाक, धुणी-भांडी करण्यासाठी पाण्याचा सामना करावा लागायचा .पिण्याच्या पाण्यासाठी तर त्यांना एकप्रकारे संघर्षच करावा लागायचा.
 
महिलांनी नेतृत्व करुन जलस्वराज्य प्रकल्प -२ योजनेच्या यशस्वीतेसाठी आपल संगठन आणखी मजबूत केल. व महिला समितीने पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आपला पदर खोचला. योजनेच्या सुरुवातीपासून तर सगळया टप्प्यांवर महिलाच अग्रेसर होत्या. जलस्वराज्य प्रकल्प -२ अंतर्गत माथनी ग्रामपंचायतीला सुरु झालेला पाणीपुरवठा हा महिलांच्या सांघीक नेतृत्वाच फलीत आहे. याची ही यशेगाथा