चनकापूर

10 Mar 2021 12:09:25
 
 
चनकापूर - नागपूर जिल्हा पासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल, कोराडी, खापरखेडा औष्णीक विद्युत केंद्र आणि खनीज खाण उद्योगांनी वेढलेल पंचायत समिती सावनेर मधील पोटा चनकापूर हे एक निमशहरी गांव. खाणींमुळे दिवसागणीक पाण्याची पातळी खोल जात होती. पर्यायी पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली.
 
पोटा चनकापूरसारख्या निमशहरी गावात जिथे आव्हाने जास्त आहेत आणि संसाधने मर्यादित आहेत, अश्यावेळी लोकांच्या सहभागाने ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी प्रामाणिक प्रत्नांनी जलस्वराज्य प्रकल्प -२ अंतर्गत ग्रामस्थांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट व पाणी पुरवठा योजना पूर्ण केली.
 
पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामपंचायतींच्या संरपंचानी शांतपणे दिलेल्या लढयाची ही यशेगाथा..
 
Powered By Sangraha 9.0