घुकशी

NAGPURZP    10-Mar-2021
Total Views |
 
घुकशी – नागपूर जिल्हयातील पारशीवनी पंचायत समिती अंतर्गत उमरीपाली या ग्रामपंचायतीमधील घुकशी हे आदिवासी बहूल गांव . फलेाराईडयुक्त पाणी पिल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी खालावते, दातांचा आणि हाडांचा फलोरोसीस नावाचा आजार होतो आणि समुदायाच्या एकूण आरोग्याच्या पातळीवर परिणाम हेातो हे समजणे कठीण असले तरी एक वेदनादायक सत्य आहे.
 
याच वेदनादायक सत्याचा घुकशी गावाला सामना करावा लागायचा.. घरासाठी पाणी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्या महिलांवर होती त्याच महिलांना आता येणा-या पिढीसाठी शुध्द व सुरक्षीत पाणी पुरवठा हवा होता. जलस्वराज्य प्रकल्प २ अंतर्गत घुकशी गावात R.0. PLANT बसवून ग्रामस्थांना शुध्द व सुरक्षीत पाणी पुरवठा सुरु झाला .त्याची ही यशोगाथा..